टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर इंग्लंड विरुद्धचे कसोटी सामने सुरुवात होण्यास बराच कालावधी असल्याने, भारतीय क्रिकेटपटू इंग्लंड मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.
टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण
टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण Saam Tv

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर इंग्लंड England विरुद्धचे कसोटी सामने सुरुवात होण्यास बराच कालावधी असल्याने, भारतीय India क्रिकेटपटू इंग्लंड मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. यावेळी संघामधील एका महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची Corona बाधा झाली आहे. इंग्लंडच्या संघामध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे शिरकाव झाल्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

यावेळी भारताचा कीपर फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही गेल्या काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होते. पीटीआयने सांगितलेल्या माहितीनुसार ऋषभ लंडन मध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आयसोलेशन करण्यात आले आहे. यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय टीमसोबत तो जाणार नाही. सुदैवाने टीममधील इतर खेळाडूंना कोरोनाची झाले नसल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत गेल्या ८ दिवसांपासून आयसोलेशनमध्ये असून, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र, तरी देखील सुरक्षेचा उपाय म्हणून आणखी काळ विश्रांती करणार आहे. भारतीय संघ डरहमला खेळायला जाणाऱ्या सराव सामन्यासाठीही पंत टीम बरोबर यावेळी नसणार आहे.

टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का.. 

पंतची प्रकृती व्यवस्थित होण्याकरिता किती दिवस लागणार, या विषयी कोणतीच माहिती समोर आली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून युकेमधील आढळणारा डेल्टा वेरियंटचे पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यामनी युके मध्ये कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे सूचना दिले आहेत. ज्यामध्ये त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक २०२० विम्बल्डनसारख्या स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केल आहे.

मात्र, इतर खेळाडूंप्रमाणेच पंतने देखील इंग्लंड विरुद्ध जर्मनी या सामन्यात लंडनच्या वेम्बली मैदानात हजेरी लावली होती. यामुळे त्या ठिकाणी त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली आहे. ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्याजागी टीम मध्ये कोणाला स्थान मिळणार, या विषयी टीम व्यवस्थापन अभ्यास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com