
Rishabh Pant News : टीम इंडिया सध्याच्या घडीला न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत विकेटकीपर आणि फलंदाज रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीमुळं टीम इंडिया व्यवस्थापनाचं टेन्शन वाढलं आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला आहे. रिषभ पंत हा मिळालेल्या संधी दवडतो आहे. त्याला फॉर्मात परतण्यासाठी विश्रांती देण्याची गरज आहे, असं श्रीकांत म्हणाले.
रिषभ पंत हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी ठरत आहे. त्यानं क्रिकेटमधील सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अखेरचे अर्धशतक फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध केले होते. २०२२ मध्ये टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ डावांत केवळ दोनदा ३० धावांचा आकडा पार केला आहे. (Latest Marathi News)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ वर्षीय रिषभ पंतने यावर्षी नऊ डावांत दोन अर्धशतके आणि एक शतक ठोकलं आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रिषभ अपयशी ठरत आहे. श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं की, तुम्ही रिषभला विश्रांती देऊ शकता. थोडी वाट बघ असं त्याला सांगू शकता. जोरदार पुनरागमन कर आणि भारतासाठी चांगला खेळ. विश्रांती देण्याआधी काही सामन्यांमधील त्याच्या कामगिरीची प्रतीक्षा करत आहात काय? की आणखी एक-दोन सामने खेळवल्यानंतर त्याला बाहेर करणार आहात काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.(Sports News)
रिषभ पंतला जितक्या संधी मिळाल्या, त्याचा फायदा घेता आला नाही. मी खूपच निराश आहे. हे काय चाललंय? असंही श्रीकांत म्हणाले. रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेत अवघ्या १७ धावा केल्या आहेत. तर पहिल्या वनडे सामन्यात १५ धावा करून तो बाद झाला होता.
ब्रेक देणंच योग्य...
रिषभ पंत संधी दवडतो आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या सामन्यांत चांगली कामगिरी केली तर ही चांगली गोष्ट आहे. वर्ल्डकप स्पर्धा लवकरच होणार आहे. पंतच्या बॅटमधून धावा निघत नाहीत असं अनेक जण बोलत आहेत. हे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखेच आहे, याकडेही श्रीकांत यांनी लक्ष वेधले.
सध्या रिषभ पंत स्वतःच दबावात खेळतोय. त्यानं स्वतःच यातून बाहेर पडायला हवं. त्याला टिकून खेळावं लागणार आहे. तो प्रत्येक वेळी आपली विकेट बहाल करतोय, असंही श्रीकांत म्हणाले. दरम्यान, रिषभ पंतला न खेळवता संजू सॅमसनला संधी दयावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे. मात्र, अद्याप तरी ती शक्यता दिसत नाही. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी होणार आहे. अशात आता रिषभ पंतऐवजी सॅमसनला खेळवणार का? हे पाहणे औत्सु्क्याचे ठरेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.