
यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात रंगणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघातील सामन्याने या स्पर्धेचा नारळ फुटणार आहे.
या स्पर्धेसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. नुकताच बीसीसीआयने देखील मिशन वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करताना दिसून येणार आहे. तर त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल मैदानात उतरणार आहे. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. या संघात श्रेयस अय्यरला देखील स्थान दिलं गेलं आहे. तसेच मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवचा देखील या संघात समावेश करण्यात आला आहे.
यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल आणि ईशान किशनचा या संघात समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांना संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.
या संघात वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा अनुभवी जसप्रीत बुमराहच्या हाती असणार आहे. त्याने नुकताच आयर्लंड विरुद्धच्या टी -२० मालिकेतून कमबॅक केले आहे. आगामी वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरचा या संघात समावेश करण्यात आला आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संघात स्थान दिलं गेलं आहे.
रोहित शर्मा( कर्णधार), शुबमन गिल,विराट कोहली ,श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल. तर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.