T-20 World Cup: IPLच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना संधी; जाणून घ्या

यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup India Team Squad) भारतीय संघाची बुधवारी (8 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे.
T-20 World Cup: IPLच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना संधी; जाणून घ्या
T-20 World Cup: IPLच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना संधी; जाणून घ्याTwitter/ @mipaltan

यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup India Team Squad) भारतीय संघाची बुधवारी (8 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा उपकर्णधार असणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील 31 सामने वर्ल्ड कपच्या आधी यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाचे सर्व खेळाडू आयपीएल देखील खेळणार आहेत.

अशा परिस्थितीत, आयपीएलच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना यावेळी टी -20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे ते जाणून घेऊयात. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह 6 खेळाडूंचा निवडलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि राहुल चहर यांचा समावेश करण्यात आला आहे.

T-20 World Cup: IPLच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना संधी; जाणून घ्या
World Cup: भारतीय संघाची निवड, दिग्गजांना डच्चू; जाणून घ्या संपूर्ण संघ

राजस्थान रॉयल्सच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळालेली नाही. पंजाब किंग्जचे 2, दिल्ली कॅपिटल्सचे 3, चेन्नई सुपर किंग्जचे 3 खेळाडू संघात निवडले गेले आहेत. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील 1-1 खेळाडूची संघात निवड करण्यात आली आहे. बंगळुरू संघाच्या कर्णधार विराट कोहलीला टीम इंडियाची कमान देण्यात आली आहे.

पंजाब किंग्स

लोकेश राहुल (KL Rahul)

मोहम्मद शमी (Mohammed Shami)

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (Rohit Sharma)

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

ईशान किशन (विकेटकीपर) (Ishan Kishan)

जसप्रीत बुमराह (Japsirit Bumrah)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

राहुल चाहर (Rahul Chahar)

आरसीबी

विराट कोहली (Virat Kohli)

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (यष्टिरक्षक) (Rishabh Pant)

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अक्षर पटेल (Axar Patel)

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

चेन्नई

रविंद्र जड़ेजा (Ravindra Jadeja)

शार्दुल ठाकुर (Shardul Thakur)

दीपक चाहर (Deepak Chahar)

हैद्राबाद

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

कोलकत्ता

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com