Virat-Hardik Dance : 'शाका बूम' गाण्यावर विराट-हार्दिकचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

हार्दिक आणि विराट कोहलीचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli Hardik Pandya Dance Video
Virat Kohli Hardik Pandya Dance VideoSaam TV

Virat Kohli Hardik Pandya Dance Video : टीम इंडियाचे दोन उत्कृष्ट खेळाडू विराट कोहली आणि हार्दिक (Hardik Pandya) पांड्या सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. नुकत्यात झालेल्या आशियात दोघांनीही आपला फॉर्म पकडलाय. विराट (Virat Kohli) आणि हार्दिक क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त आपल्या खासगी आयुष्यातही चर्चेत असतात. विराटचे इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलवर्स आहेत. तर हार्दिक पांड्यालाही सोशल मीडियाची प्रचंड आवड आहे. (Viral Dance Video)

Virat Kohli Hardik Pandya Dance Video
Funny Video : नवरीला सोडून करवलीच पकडली; भर मंडपात नवरदेवाने काय केलं? पाहा...

ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी नुकताच हार्दिक आणि विराट कोहलीचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Dance Video) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्यासोबत 'शाका बूम' या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. दोघाही खेळाडूंना सोबत डान्स करताना पाहून क्रिडाप्रेमीही भारावून गेले आहेत.

विराट आणि हार्दिकने 'शाका बूम' गाण्यावर धरलेला ठेका इंस्टाग्रामवर (Viral Video) खूप ट्रेंड करत आहे. व्हिडीओत गॉगल आणि चप्पल घालून दोन्ही खेळाडू सोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. (Best Dance Videos)

हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘तुम्हाला माहित आहे की आम्ही ते कसे करतो.’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडू स्वत:ला ताजेतवानं करण्यासाठी असं केलं जातंय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पसंती दिली असून व्हिडीओवर हजारांहून अधिक प्रतिक्रिया येत आहेत.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मोहालीत सराव

भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ यजमान टीम इंडियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मोहालीत होणाऱ्या मालिकेतील पहिल्या टी20 आधी ऑस्ट्रेलियन संघानं कालपासूनच सरावाला सुरुवात केली. कर्णधार फिंचसह स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड यांनी कसून सराव केला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com