IND vs AUS 1st ODI: वानखेडे स्टेडियमवरचा १२ वर्षांचा दुष्काळ संपला; टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मोठा विजय

टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे.
IND vs AUS 1st ODI
IND vs AUS 1st ODISaam tv

मुंबई : टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम ऑस्ट्रेलियाने १८८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा टीम इंडियाने सहज पाठलाग करत सामना खिशात टाकला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षापासूनचा दुष्काळ संपला आहे. (Latest Marathi News)

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के.एल. राहुलच्या ७५ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलिया धूळ चारली आहे. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिके १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या किरकोळ १८८ धावांच्या पाठलाग करताना टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने ३९ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर उतरलेल्या फलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं.

टीम इंडियाच्या केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या संयमी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ७५ धावा केल्या.

या खेळीत केएल राहुलने सात चौकार आणि एक षटकार लगावला. रविंद्र जडेजानेही नाबाद 69 धावा कुटल्या. तर शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 20 आणि 25 धावा चोपल्या.

IND vs AUS 1st ODI
Tim Paine Retirement: भारताविरुद्ध वनडे सीरीज सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूची निवृत्तीची घोषणा!

वानखेडेवरचा १२ वर्षांचा दुष्काळ संपला

टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे. वानखेडे स्टेडियमवर दोघांमध्ये ५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने तीन आणि ऑस्ट्रेलियाने २ सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाला वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (Australia) पराभवावा सामोरं जावं लागलं आहे. या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला १२ वर्षांनी पराभूत करण्यात यश आलं आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com