U19 T20 World Cup: 'या' पाच खेळाडूंनी गाजवले वर्ल्डकपचे मैदान, Team India च्या विजयात आहे मोलाचा वाटा...

कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार खेळ केला.
U19 t20 Wc Team
U19 t20 Wc TeamSaamtv

U19 Womens T20 World Cup: १९ वर्षाखालील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी जिगरबाज खेळी करत इंग्लडचा धुव्वा उडवला. या सामन्यात तब्बल सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले.

कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार खेळ केला. ज्यामधील पाच खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत जोरदार खेळ करत विजय खेचून आणला.

U19 t20 Wc Team
U19 T20 WC 2023: आनंद विश्वविजयाचा! WC जिंकल्यानंतर पोरींनी असा केला जल्लोश, पाहा फोटो....

1.शेफाली वर्मा : कर्णधार शेफाली वर्माने (Shefali Varma) संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळ दाखवला. शेफाली वर्माने सात सामन्यांत 24.57 च्या सरासरीने 172 धावा केल्या ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. शेफालीने नेतृत्व कौशल्याचीही चुणूक दाखवली. शेफाली आता पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकातही सहभागी होणार आहे.

2. श्वेता सेहरावत: श्वेता सेहरावतने फायनलमध्ये भलेही पाच धावा केल्या असतील, पण तिने संघाला विजेतेपदापर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सलामीवीर श्वेता सेहरावतने सात सामन्यांत 99 च्या अप्रतिम सरासरीने 297 धावा केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. श्वेता या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

U19 t20 Wc Team
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; मराठवाड्यात पुढचे ५ दिवस सौम्य थंडी

3. पार्श्वी चोप्रा: फिरकीपटू पार्श्वी चोप्रा ही भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज होती. पार्श्वीने 6 सामन्यात सातच्या सरासरीने 11 बळी घेतले. पाहिल्यास, संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मॅगी क्लार्कने पार्श्वीपेक्षा जास्त विकेट घेतल्या. अंतिम सामन्यातही पार्श्वीने दोन खेळाडूंना बाद केले.

4. मन्नत कश्यप: डावखुरा फिरकी गोलंदाज मन्नत कश्यपची कामगिरीही उत्कृष्ट होती. मन्नत कश्यपने 6 सामन्यात 10.33 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या. अंतिम सामन्यातही मन्नतने दमदार गोलंदाजी करत एकूण 13 धावांत एक बळी घेतला.

अर्चना देवी : भारतीय संघाच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 18 वर्षीय अर्चना देवीनेही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अर्चनादेवीने सातही सामन्यांमध्ये एकूण आठ विकेट घेतल्या. अंतिम सामन्यातही अर्चनाने दोन विकेट घेत इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले. (Shefali Varma)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com