
बँकॉक (Thailand Open 2022) : भारताच्या पी व्ही सिंधूने (pv sindhu) जपानच्या यामागुची (Akane Yamaguchi) हिचा पराभव करत थायलंड ओपनची (Thailand Open) बॅडमिंटन (badminton) उपांत्य फेरी गाठली. उद्या (शनिवार) उपांत्य फेरीत सिंधूची लढत चीनची चेन युफेई (Chen Yufei) हिच्या बराेबर असेल. (pv sindhu latest marathi news)
आजच्या सामन्यात सिंधूने पहिला सेट २१-१५ असा जिंकला. तिला यामागुचीविरुद्ध दुस-या सेटमध्ये विजयाची संधी हाेती. मात्र तिने रॅलीजवर भर दिल्याने यामागुचीला प्रतिकाराची संधी मिळाली. हा सेट सिंधूने २०-२२ असा गमावला.
तिस-या सेटमध्ये सिंधू उत्तम कामगिरी करीत २१-१३ असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. बँकॉक येथील इम्पॅक्ट एरिना येथे उद्या (शनिवारी) उपांत्य फेरीत सिंधूचा मुकाबला ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईशी होईल.
दरम्यान थायलंड ओपन स्पर्धेत अन्य भारतीय खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सिंधू ही एकमेव मैदानात राहिली असून तिच्या आजच्या विजयामुळे भारताच्या पदकाच्या संधीही जिवंत राहिल्या आणि कांस्यपदक निश्चित केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.