धोनी IPL मध्ये कधीपर्यंत खेळणार? CSK च्या मालकानं दिलं उत्तर

आयपीएलमध्ये बर्‍याच दिवसांपासून धोनीची बॅट शांत आहे.
धोनी IPL मध्ये कधीपर्यंत खेळणार? CSK च्या मालकानं दिलं उत्तर
एम एस धोनीTwitter/ @ChennaiIPL

बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) 40 वर्षांचा झाला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), काशी विश्वनाथन यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “धोनी चेन्नई सुपर किंग्जबरोबर आणखी एक किंवा दोन वर्षे खेळू शकतो. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो भरपूर ट्रेनिंग घेत आहे. त्यामुळे संघ सोडण्याचे सध्यातरी काही कारण दिसत नाहीये".

यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्‍या आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांमध्ये धोनी पुढाकार घेईल. यासह, तो स्पर्धेत गमावलेला फॉर्म परत मिळवू शकतो. आयपीएलमध्ये बर्‍याच दिवसांपासून धोनीची बॅट शांत आहे. आयपीएलचा 2021 चा हंगाम कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात सात सामने खेळले आहेत. 7 सामन्यात संघाने पाच जिंकले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

एम एस धोनी
Tokyo Olympics: 'सोने की चिडिया' असलेल्या भारताचा 'सुवर्ण' इतिहास तोकडाच!

फलंदाजीच्या बाबतीत धोनीचा हा हंगाम खूप वाईट गेला आहे. त्याने सात सामन्यांत अवघ्या 37 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी केवळ 12.33 आहे. तथापि, त्याला सात सामन्यांत फक्त चार वेळा फलंदाजी करायला मिळाली आणि एका डावात तो नाबाद राहिला. मागील हंगामात संघाची कामगिरी आणि धोनीची कामगिरी दोनिही अतिशय खराब होती.

मागिल हंगामात आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. यानंतर धोनीच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या फलंदाजीवर जोरदार टीका झाली. अनेक दिग्गजांचा असा विश्वास होता की धोनीने आता आयपीएल खेळू नये, परंतु २०२१ च्या मोसमात संघाने आश्चर्यकारक पुनरागमन केले. संघ पुन्हा फॉर्मात परतला आहे. त्याप्रमाणे धोनीही त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला आहे, त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com