नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कार

अहमदनगरच्या सुदर्शन महादेव कोतकर याने उत्तर महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे
नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कार
नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कारSaam Tv

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर परत एकदा कुस्त्यांचे फड रंगू लागले आहेत. राज्यामध्ये विविध ठिकाणी कुस्त्या होत आहेत. दरम्यान, नुकताच उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आहे. यामध्ये अहमदनगरच्या सुदर्शन महादेव कोतकर याने उत्तर महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे. गेल्या जवळपास २ वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यात कुस्ती स्पर्धा आता हळुहळू सुरू होत आहेत.

हे देखील पहा-

२ वर्षानंतर पाथर्डीमध्ये मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर कुस्तीगीर परिषद आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये उत्तर महाराष्ट्रात सूमारे ३०० मल्ल सहभाग नोंदविले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने अहमदनगरच्या पाथर्डी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कार
'देवमाणूस 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक

या स्पर्धेमध्ये अंतिम लढत अहमदनगरच्या सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथील बाळू बोडखे यांच्यामध्ये पार पडली आहे. यामध्ये नगरच्या सुदर्शन कोतकरने यशाची बाजी मारली आहे. सुदर्शन कोतकरने नाशिकच्या बाळू बोडखेवर मात करत चांदीची गदा आणि ५१ हजारांचे पारितोषिक पटकावले आहे. सुदर्शन कोतकर हा १२४ किलोचा तर बाळू बोडखे हा ८४ किलोचा पैलवान आहे.

या दोघाच्या वजनामध्ये खूप मोठा फरक असला तरी, बोडखेने कोतकरला सहजासहजी जिंकू दिले नाही. सुदर्शन कोतकर आणि बाळू बोडखे यांच्यात तब्बल ४० मिनिटे कुस्ती रंगली होती. बोडखेने अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चांगलीच झुंज दिली आहे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com