'IPL ची प्रतिमा धोक्यात'; दिल्लीच्या संघातील कोरोना प्रकरणाने BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) 10 संघ खेळत आहेत. परंतु कोरोनाचा संसर्ग फक्त एकाच टीममध्ये होत आहे.
'IPL ची प्रतिमा धोक्यात'; दिल्लीच्या संघातील कोरोना प्रकरणाने BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये
IPL 2022Saam TV

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) 10 संघ खेळत आहेत. परंतु कोरोनाचा संसर्ग फक्त एकाच टीममध्ये होत आहे. दिल्ली कॅपिटल्स हा लीगमधील एकमेव संघ आहे ज्याला कोरोनाचा फटका बसला आहे. या टीममधून कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा हल्ला एकाच संघावर का? या प्रश्नाच्या उत्तराबाबत बीसीसीआय संभ्रमात आहे. यामुळे आयपीएलच्या प्रतिमेला हानी पोहोचत असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता BCCI याबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय पुढे काय कारवाई करेल याबाबत काही समोर आलेले नाही.

दिल्ली कॅपिटल्स संघामधिल कोरोनाचे ताजे प्रकरण 8 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी समोर आले. यामध्ये दिल्लीचा नेचमध्ये गोलंदाजी करणारा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आला. याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यापुर्वीही दिल्लीच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

IPL 2022
अदानी ग्रुपची क्रिकेटच्या मैदानावर 'एन्ट्री'; या लीगमध्ये केला संघ खरेदी

दिल्ली संघातबाबत बीसीसीआय संभ्रमात

माध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने रविवारी या परिस्थितीबद्दल सांगितले, “सध्या आमच्यात गोंधळाची परिस्थिती आहे. हे वारंवार का घडत आहे हे सांगणे कठीण आहे. हा हॉटेल कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे की फ्रँचायझीच्या कर्मचारी किंवा खेळाडूंच्या. आम्ही आत्ता काही सांगू शकत नाही.''

दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबईतील हॉटेल ताजमहालमध्ये थांबला आहे. गेल्या एका महिन्यात त्या हॉटेलचे ४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करणार आहे. बायो-बबल असतानाही संघात खेळाडू का पॉझिटीव्ह येत आहेत याची चौकशी बीसीसीआय करणार आहे.

बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करेल

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करून ठोस कारवाई करू. जेणेकरून पुन्हा असे घडू नये. कारण, यामुळे आयपीएलची प्रतिमा धोक्यात आली आहे. परंतु हे पूर्वीपासूनच घडत असल्याने कोरोनाच्या वाढीचे कारण शोधणे फार कठीण आहे. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.