Tokyo 2020 : टोकियो ऑलिम्पिकवर करोनाचं सावट; आढळला पहिला रुग्ण

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठं संकट
Tokyo 2020 : टोकियो ऑलिम्पिकवर करोनाचं सावट; आढळला पहिला रुग्ण
Tokyo 2020 : टोकियो ऑलिम्पिकवर करोनाचं सावट; आढळला पहिला रुग्णSaam Tv

पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. २३ जुलैपासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडानगरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.

या घटनेला आयोजकांनीही दुजारो दिला आहे. एक अधिकारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. सध्या त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक २०२० ही स्पर्धा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

हे देखील पहा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. मात्र आता करोनाने ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री केली आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी याची माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धेसाठी चिंतेचा विषय असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Tokyo 2020 : टोकियो ऑलिम्पिकवर करोनाचं सावट; आढळला पहिला रुग्ण
बीडच्या मादळमोही गावात थरार....भर दुपारी तरुणावर गोळीबार

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. चाचण्या केल्या जात असताना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असून, हा पहिलाच रुग्ण आहे,अशी माहिती टोकियो ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मासा टाकाया यांच्या कडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com