
भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं मिश्रण असल्याचे पाहायला मिळाले आहे.
ही स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघातील ३ खेळाडू निवृत्तीची घोषणा करू शकतात. कोण आहेत ते ३ खेळाडू जाणून घ्या.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आता ३६ वर्षांचा झाला आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या फिटनेसवर स्पष्टपणे दिसून येत आहे. रोहित खेळाडू म्हणून तिसऱ्यांदा आणि कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.
दोन्ही वेळेस भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत रोहित शर्माने ५ शतके झळकावली होती. आगामी स्पर्धेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पुढचा वर्ल्डकप ४ वर्षांनंतर होईल तोपर्यंत त्याचं वय ४० च्या घरात असेल. त्यामुळे तो आगामी वर्ल्डकप स्पर्धेनंतर क्रिकेटला राम राम करू शकतो.
हे २ खेळाडूही घेणार निवृत्ती..
आगामी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर आर अश्विन आणि शिखर धवन हे दोघेही वनडे क्रिकेटला राम राम करू शकतात. अश्विनने २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये विजय मिळवून देण्यात अश्विनने मोलाची भूमिका बजावली होती.
आतापर्यंत ११३ सामने खेळलेला आर अश्विन ३७ वर्षांचा होणार आहे. तो वनडे क्रिकेटला राम राम करून कसोटी क्रिकेट खेळणं सुरू ठेऊ शकतो. (Latest sports updates)
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो बांगलादेश संघाविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी शिखर धवनला कर्णधार बनवणार असल्याची चर्चा होती.
मात्र त्याला संघातही स्थान दिलं गेलं नाही. आता वर्ल्डकपसाठीही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलेलं नाही. त्यामुळे शिखर धवन समोर आता निवृत्तीशिवाय दुसरा पर्याय नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.