पदक न आणणाऱ्या खेळाडूंना 'हे' सरकार देणार १० लाख रुपये

जे खेळाडू पदक जिंकले नाही त्यांना परत येताच 10-10 लाख रुपये मिळतील
पदक न आणणाऱ्या खेळाडूंना 'हे' सरकार देणार १० लाख रुपये
पदक न आणणाऱ्या खेळाडूंना 'हे' सरकार देणार १० लाख रुपयेsaam tv

देशभरात सध्या टोकियो ऑलम्पिकचे (Tokyo Olympics) वारे वाहत आहेत. यात भारतीय खेळाडूंनीही आपली चमक दाखवली आहे. मात्र काहीना सिल्वर तर काहींना ब्रॉंझ पदकावरच समाधान मानावे लागले, तर काही खेळाडू रिकाम्या हाती परत आले. ऑलम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी पदक जिंकले आहे अशा खेळाडूंसाठी हरियाणा सरकारने (Hariyana Government) मोठी घोषणा केली आहे. (This government will give Rs 10 lakh to the players who do not bring medals)

पदक न आणणाऱ्या खेळाडूंना 'हे' सरकार देणार १० लाख रुपये
निळ्या जर्सीचा माजी कर्णधार ट्विटरवरच्या ब्ल्यू टिक पासून वंचित!

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (CM Manoharlal Khattar) यांनी याबाबत घोषणा केली आहे. ''जरी बजरंग पुनिया उपांत्य फेरी जिंकला नसला तरी आम्हाला आशा आहे की तो उद्या कांस्यपदकाची लढत जिंकेल. जेव्हा सर्व खेळाडू परत येतील तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करु. आम्ही हरियाणाला क्रीडा केंद्र बनवू, असे ट्विट मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

इतकेच नव्हे तर, ''जे खेळाडू पदक जिंकले नाही त्यांना परत येताच 10-10 लाख रुपये मिळतील. आम्ही सुवर्णपदकावर 6 कोटी, रौप्य पदकावर 4 कोटी आणि कांस्यपदकासाठी 2.5 कोटी रुपये देतो. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्यांना आम्ही 50 लाख रुपयांची रक्कम जाहीर केली आहे.'' असेही मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू रवी दहिया यालादेखील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा राज्य सरकारच्या वतीने 4 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर सोबतच क्लास वन सरकारी नोकरी आणि राज्यात त्याला पाहिजे त्याठिकाणी 50 टक्के सवलतीत जमीनही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.