Tokyo Olympics: भारताने जगाला दिला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश; पाहा फोटो

Tokyo Olympic 2020 Opening Ceremony: जगातील खेळाची महत्वाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
Tokyo Olympics: भारताने जगाला दिला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश; पाहा फोटो
Tokyo Olympic 2020 Opening CeremonyTwitter/ @Tokyo2020hi

Tokyo Olympic 2020 Opening Ceremony: जगातील खेळाची महत्वाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताची बॅक्सिंग चँम्पियन मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी जगाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक खेळ प्रकारातील स्पर्धा सुरु झाली असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.30 वाजता सामन्याचा उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या Olympic Opening Ceremony मध्ये पूर्वीचा थाट नसला तरी उत्साहाच्या वातावरणात कोरोनाचे घालून दिलेले नियम पाळत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारताचे 20 खेळाडू आणि 6 ऑफिशियल या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

ऑलिम्पिकचे प्रतिक असलेल्या पाच रिंग बनवण्यासाठी वापरलेले लाकूड हे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट्सनी लावलेल्या बीजापासून तयार झालेल्या झाडाचे आहे. टोकियोने 1964 साली ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले होते.

भारताची चँम्पियन बॉक्सर मेरी कोम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com