Tokyo Olympics: इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट !

ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य आणि चोख काळजी घेतली जात आहे.
Tokyo Olympics: इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट !
Tokyo Olympics: इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट ! Saam Tv

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Tokyo 2020) पदक जिंकणार्‍या खेळाडूंना कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी त्यांना मिळालेली पदके स्वत:च्या हातानेच आपल्या गळ्यात घालावी लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOA) अध्यक्ष थॉमस बाक यांनी बुधवारी 339 स्पर्धांच्या पारंपारिक पदक सोहळ्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. बाख यांनी टोकियोहून आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलताना आंतरराष्ट्रीय माध्यमांना सांगितले की खेळाडूंच्या गळ्यात दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून पदके घालू दिली जाणार नाहीत.

बाश म्हणाले ''पदक खेळाडूंना ट्रे मध्ये दिले जातील आणि मग खेळाडू ते स्वत:च्या हाताने आपल्या गळ्यात घालतील''. त्याच बरोबर जो व्यक्ती ट्रे मध्ये पदक ठेवेल त्याला हातमोजे घालावे लागतील जेणे करुण कोेरोना विषाणूचा प्रसार पुर्णपने रोखता येईल. ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य आणि चोख काळजी घेतली जात आहे.

Tokyo Olympics: इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट !
टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण

रविवारी लंडनमध्ये झालेल्या युरो २०२० मध्ये पदक आणि ट्रॉफी सादरीकरण समारंभाच्या वेळी सेफेरिनने इटालिचा गोलकीपर जियालुइगी याच्याशी हातमिळवणी केली होती. त्याच अनुशंगाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणताही खेळाडू कोणासोबत हात मिळवणार नाही किंवा कोणाची गळाभेट घेणार नाही अशी माहिती बाक यांनी दिली आहे. यापुर्वी ऑलिम्पिकमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य किंवी समितीचे अधिकारी पदक घालत होते. याअगोदरच ऑलिम्पिक समितीने सांगितले होते की पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना मास्क सक्तिचा असणार आहे.

जपानचा राजा नरुहिटो 23 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे आणि ते खेळ सुरू करण्याची घोषणा करु शकतात असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनूसार एका अधिकाऱ्याने सांगितले नारुहिटो उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तयारी सुरु आहे. आणि प्राथमिक माहिती अशी आहे की नारुहिटो अन्य देशांच्या प्रतिनिधींना देखील भेटतील.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com