Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव

भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने टोक्यो ओलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत मोठा इतिहास रचला आहे.
Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव
Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव Saam Tv

Neeraj Chopra : भारतीय Indian भालाफेक Javelin throw खेळाडू नीरज चोप्रा Neeraj Chopra याने टोक्यो ओलिम्पिकमध्ये Tokyo Olympics सुवर्णपदक Gold medal जिंकत मोठा इतिहास रचला आहे. त्याने तब्बल ८७.५८ मीटर लांब भाला फेकत हे सुवर्णपदक मिळवले आहे. तब्बल १०० वर्षांमध्ये एथलेटिक्समध्ये athletics भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक असल्यामुळे नीरजवर संपूर्ण देशाभरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे देखील पहा-

सोबतच त्याला यामुळे कोट्यवधींचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. याच रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्याकरिता मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिस मिळाली आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टोक्यो ओलिम्पिक मधील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नीरज चोप्राला १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना २५ लाख दिले जाणार आहेत.

Tokyo Olympics 2020 : नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव
GOLD MEDAL | टोकियो ओलीम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल ; नीरज चोप्राची भालाफेकीत सुवर्ण कामगिरी ;पाहा व्हिडिओ

भारतीय हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बीसीसीआयसोबत इंडियन प्रीमियर लीगमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने नीरजला १ कोटी रुपये बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सीएसके संघ प्रशासनाने सांगितलेल्या माहिती मध्ये त्यांनी म्हटले आहे. नीरज चोप्राने मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल त्याला १ कोटी रुपये बक्षिस म्हणून, चेन्नई सुपरकिंग देणार आहे. त्याच्यासाठी ८७५८ नंबरची विशेष जर्सी देखील त्याच्याकरिता तयार करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com