Tokyo Paralympic : प्रमोद भगतने जिंकले सुवर्ण पदक (पहा VIDEO)

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली असून बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्ण पदकाची कमाई करत सुवर्ण कामगिरी केली आहे.
Tokyo Paralympic : प्रमोद भगतने जिंकले सुवर्ण पदक (पहा VIDEO)
Tokyo Paralympic : प्रमोद भगतने जिंकले सुवर्ण पदक (पहा VIDEO)SaamTv

Tokyo 2020 Paralympic : टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली असून बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्ण पदकाची कमाई करत सुवर्ण कामगिरी केली आहे. प्रमोद भगत आणि ब्रिटनचा डॅनियल बेथल यांच्यामध्ये हा अंतिम सामना रंगला होता. यात प्रमोदने बाजी मारली आहे. टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताच्या खात्यातील हे चौथे सुवर्ण पदक आहे. प्रमोद भगतने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली होती.

त्याने पहिला सेट 21-14 असा आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही त्याने दबदबा कायम ठेवत 21-17 अशा फरकाने सेटसह हा सामना जिंकला. याच गटात एम सरकारने 21-20, 21-13 अशा फरकाने सामना जिंकत भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली आहे. पॅरालिंपिक स्पर्धेत भारतासाठी आजचा सुवर्ण दिवस होता. नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण निशाणा साधला असून पुरूषांच्या 50 मीटर एअर पिस्टल SH1 क्रीडा प्रकारात त्याने लक्षवेधी कामगिरी नोंदवली आहे.

Tokyo Paralympic : प्रमोद भगतने जिंकले सुवर्ण पदक (पहा VIDEO)
VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!

याच गटात सिंहराज अधाना यांनी रौप्य पदकाची कमाई केली असून दुसरीकडे बॅडमिंटनमध्येही भारताचा दुहेरी धमाका पाहायला मिळाला आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL-3 गटात प्रमोदने सुवर्ण कामगिरी करुन इतिहास रचला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे हे पहिले सुवर्ण पदक असून याच गटात एम सरकारने कांस्य पदकाची कमाई केली आहे. नेमबाजी आणि बॅडमिंटनमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात आता 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह एकूण 17 पदके झाली आहेत. पदतालिकेत भारत आता 25 व्या स्थानावर पोहचला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com