तिरंदाज हरविंदर सिंगची जबराट कामगिरी; भारतीय संघास १३ वे पदक

तिरंदाज हरविंदर सिंगची जबराट कामगिरी; भारतीय संघास १३ वे पदक
Harvinder Singh

tokyo paralympics 2020 : आर्चर हरविंदर सिंगची कास्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या किम मिन सुचा याच्याबराेबर चूरशीची लढत झाली. या चूरशीच्या लढतीत हरविंदरने harvinder singh जबरदस्त कम बॅक करीत ६-५ असा विजय मिळवित भारताची पदकतालिकेत भर टाकल्याने संख्या १३ वर पाेहचली. हरविंदर सिंगने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह स्पर्धेत हे यश मिळविले आहे. tokyo-paralympics-archery-harvinder-singh-bronze-medal-mens-individual-recurve-indian-medallists-sml80

Harvinder Singh
'उत्सव गणेशाचा-जागर मताधिकाराचा’; जिंका २१ हजारांचे बक्षीस

अखेरच्या पाचव्या सेटच्या शेवटच्या क्षणास हरविंदरने १० गुण मिळवित या विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी किम मिन सुचा यास ८ गुण मिळविता आला. त्यापुर्वी दाेन्ही खेळाडूंचे ५-५ असे समान गुण हाेते. हरविंदरने विजय मिळविताच भारतीय खेळाडूंनी जल्लाेष केला.

३० वर्षीय तिरंदाज उपांत्य फेरीत अमेरिकेच्या केव्हिन माथेरकडून ४-६ ने पराभूत झाला होता. हरविंदरने दिवसाची सुरुवात इटलीच्या स्टेफानो ट्रॅविसानीवर ६-५ असे जिंकला हाेता. दरम्यान हरविंदरच्या विजयाने देशाची पदक संख्या १३ वर पाेहचली आहे. सकाळी अवनी लेखरा आणि प्रवीण कुमार यांनी उत्तम कामगिरी करीत पदक खेचून आणले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com