निराशजनक; नेमबाज राहूल ५ व्या स्थानावर; अरुणा तनवार जखमी

निराशजनक; नेमबाज राहूल ५ व्या स्थानावर; अरुणा तनवार जखमी
Rahul Jakhar

टाेकियाे : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेतील मिश्र गटात २५ मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताच्या राहूल जाखड Rahul Jakhar १२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला. तसेच तायक्वाेंदाेत अरुणा तनवार जखमी झाल्याने तिला ही सामना साेडावा लागला. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली.

नेमबाज राहूल जाखड याने पी ३ मिश्र २५ मीटर पिस्टल एसएच १ गटातील अंतिम फेरीत प्रवेश मिळविला हाेता. प्रिसिजन आणि रॅपीड फेरीत त्याने एकूण ५७६ गुण मिळवीत दूसरे स्थान पटकाविले हाेते. अंतिम फेरीत त्याला संमिश्र यश मिळाले.

Rahul Jakhar
NH 4 वर तेलाचा ट्रक पलटी; पाेलिस घटनास्थळी दाखल

आजच्या स्पर्धेत चीनच्या झिंग हुआंगने २७ गुणांसह सुवर्ण , सिझिमोन सोविन्स्की (पीओएल) आणि ओलेक्सी डेनिसियुक (यूकेआर) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक जिंकले. दरम्यान तायक्वाेंदाेत अरुणा तनवारने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला परंतु ती जखमी झाल्याने तिला सामना साेडावा लागला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com