महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सन्नाटा; सुयशसह निरंजन आऊट

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात सन्नाटा; सुयशसह निरंजन आऊट
suyash jadhav

टोकियो : दाेन दिवसांपुर्वी क्रीडाप्रेमींना निराश करणा-या भारतीय जलतरणपटू सुयश नारायण जाधव suyash jadhav हा आज tokyo paralympics मध्ये कमबॅक करेल अशी आशा हाेती परंतु ती फाेल ठरली. सुयश आणि निरंजन मुकुंदन हे आज (शुक्रवार) येथे झालेल्या पॅरालिंपिकमधील पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय क्रीडा प्रकारातील एस ७ गटातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत.

जकार्ता मधील सन २०१८ च्या आशियायी पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविणा-या सुयशने ३२.३६ सेकंद अशी वेळ नाेंदवीत यूएसएचा ऑस्टिन इव्हान (२९.७१ सेकंद) पेक्षा २.६५ सेकंदांनी पिछाडीवर राहिला. त्यामुळे ताे पाचव्या स्थानावर फेकला गेला.

suyash jadhav
दाेन पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली अवनी लेखरा

सुयश बराेबरच बंगळरूचा २६ वर्षीय मुकुंदन ३३.८२ सेकंद अशी वेळ नाेंदवीत सहाव्या स्थानावर राहिला. या गटात फक्त पहिले चार खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असल्याने भारतीय खेळाडूंसह क्रीडाप्रेमींची निराशा झाली.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com