Team India Key Players: रोहित, गिल नव्हे तर, 'हे' आहेत भारतीय संघाचे टॉप ५ हुकमी एक्के

WTC Final 2023: भारतीय संघात ५ खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
team india
team indiasaam tv

Ind vs Aus WTC Final 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल चांगलाच चर्चेत राहिला.

त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

या सामन्यात शुभमन गिलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान आणखी ५ खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

team india
WTC Final: 'आमच्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली..' ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ

रवींद्र जडेजा:

रवींद्र जडेजा हा भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून देण्यात जडेजानेने मोलाची भूमिका बजावली होती. शेवटच्या चेंडूवर त्याने चौकार मारून चेन्नईला पाचवी ट्रॉफी मिळवून दिली होती. आता अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

चेतेश्वर पुजारा:

कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जातो. ही भिंत पाडण्यात भल्या भल्या दिग्गज गोलंदाजांना जमत नाही. चेतेश्वर पुजारा हा नुकताच काऊंटी स्पर्धा खेळून आला आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडमधील परिस्थितीचा चांगलाच अंदाज आला असेल. त्याला बाद करणं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. (Latest sports updates)

team india
WTC Final: रोहित शर्माच्या चिंतेत वाढ! WTC च्या अंतिम सामन्यात दिग्गज खेळाडूंशिवाय उतरावं लागणार मैदानात

विराट कोहली:

भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. नुकताच पार पडलेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने २ शतकांसह ६३९ धावा केल्या आहेत, तसेच विराटचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा रेकॉर्ड दमदार आहे. ही कामगिरी पाहता नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली असणार आहे,

मोहम्मद शमी:

मोहम्मद शमीने नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत पर्पल कॅप पटकावली आहे. टी-२० क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील तो तितकाच भेदक गोलंदाज ठरतो. जसप्रीत बुमराह संघाबाहेर असला तरीदेखील मोहम्मद शमी त्याची जागा भरून काढण्याचं काम करतोय. मोहम्मद शमीला जर स्विंग मिळाला तर, तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कर्दनकाळ ठरू शकतो.

अजिंक्य रहाणे:

आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला २०१४,२०१८ आणि २०२१ इंग्लंड दौरा खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव पाहता तो भारतीय संघातही एक्स फॅक्टर ठरू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com