
बँकॉक : थायलंड (thailand) येथे सुरु असलेल्या उबेर करंडक (uber cup 2022) बॅडमिंटन (badminton) स्पर्धेतील (competition) अंतिम (गट ड) लढतीत कोरियाने भारताचा ०५ - ०० असा दणदणीत पराभव केला. भारतीय महिला संघाने कॅनडा (canada) आणि यूएसएचा (USA) पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत यापुर्वीच जागा निश्चित केली होती परंतु कोरियाविरुद्ध साजेशी कामगिरी करता आली नाही. (uber cup 2022 latest marathi news)
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला (p v sindhu) जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या एन सीयंगकडून (An SeYoung) पराभव पत्करावा लागला. सुमारे ४२ मिनीट चाललेल्या या सामन्यात सिंधूचा २१ - १५, २१ - १४ असा पराभव झाला.
एन सीयंगने सिंधूला सलग चौथ्यांदा पराभूत केले आहे. सिंधूला आतापर्यंत या दौऱ्यात कोरियन स्टारला पराभूत करण्यात यश आलेले नाही. दरम्यान दुहेरीत भारताच्या सिमरन सिंघी (Simran Singhi) आणि शुती मिश्रा (Shuti Mishra) या जोडीला ली सोही (Lee Sohee) आणि शिन सेंगचेन (Shin Seungchen) यांनी २१-१३, २१-१२ असे पराभूत केले.
या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या अक्षरी कश्यपला (Akarshi Kashyap) किम गेनकडून (Kim Gaeun) २१-१०, २१-१० असे पराभूत व्हावे लागले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.