Ind vs Aus 3rd Test: युवी नव्हे तर 'हा' आहे टीम इंडियाचा 'सिक्सर किंग', मोठ्या विक्रमात विराटची बरोबरी करत रवी शास्त्रींना सोडलंय मागे

भारतीय संघातील एका खेळाडूने रवी शास्त्री आणि युवराज सिंगचा विक्रम मोडून काढला आहे.
umesh yadav
umesh yadavsaam tv

Ind vs Aus Umesh Yadav Record: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. कारण भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला आहे. दरम्यान भारतीय संघातील एका खेळाडूने रवी शास्त्री आणि युवराज सिंगचा विक्रम मोडून काढला आहे. (Latest sports updates)

या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीने २२ धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमीच्या जागी संधी मिळालेल्या उमेश यादवने १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने भारतीय संघाची धावसंख्या १०० च्या पार पोहचवली.

यादरम्यान उमेश यादवने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट आणि उमेशने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २४-२४ षटकार मारले आहेत.

umesh yadav
Ind vs Aus 3rd Test: इंदूरच्या खेळपट्टीवरून गदारोळ का? समजून घ्या ५ पॉइंट्समधून

मोडून काढला रवी शास्त्री आणि युवराज सिंगचा विक्रम..

या सामन्यात भारतीय संघाकडून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. मात्र उमेश यादवने आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याने आपल्या छोट्या इनिंगमध्ये २ गगनचुंबी षटकार मारले.

यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत रवी शास्त्री आणि युवराज सिंग यांना मागे सोडले आहे. दोघांनी प्रत्येकी २२-२२ षटकार मारले आहेत.

umesh yadav
IND VS AUS 3rd Test: फिरकीनेच केला टीम इंडियाचा घात ! भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात

ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर..

या सामन्यात सध्या ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावातफलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ४ गडी बाद १५६ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com