Ruturaj Gaikwad: कस्सं कायssss ! एका षटकात ७ षटकार; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विस्फोटक खेळी, VIDEO पाहा

ऋतुराज गायकवाडनं एकाच षटकात सात षटकार खेचून इतिहास रचला आहे.
Ruturaj Gaikwad Sixes/BCCI Domestic
Ruturaj Gaikwad Sixes/BCCI Domestic saam tv

Ruturaj Gaikwad Sixes : सध्या टीम इंडियाच्या बाहेर असलेला सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं आपल्या बॅटनं टीकाकारांना जबरदस्त उत्तर दिलं आहे. ऋतुराजनं जे करून दाखवलं आहे, ते आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला जमलं नाही. महाराष्ट्राचा युवा फलंदाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे करंडक २०२२ मध्ये क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशच्या विरुद्ध खेळताना एकाच षटकात लागोपाठ सात षटकार ठोकून विश्वविक्रम रचला. आता एका षटकात सात षटकार हे कसं शक्य आहे, असा विचार करत असाल तर नेमकं त्या षटकात काय घडलं वाचा.

विजय हजारे करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलची लढत महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात झाली. या सामन्यात खेळताना ऋतुराज गायकवाडनं विस्फोटक खेळी केली. त्यानं एकाच षटकात लागोपाठ सात षटकार ठोकले. एक षटकार त्यानं नो बॉलवर खेचला. या षटकात एकूण ४३ धावा चोपल्या. ऋतुराजनं या सामन्यात द्विशतक झळकावलं. सात षटकार ठोकण्याचा विक्रम त्यानं शिवा सिंह याच्या षटकात केला. या डावातील ४९ वं षटक होतं.  (Latest Marathi News)

व्हिडिओ पाहा!

Ruturaj Gaikwad Sixes/BCCI Domestic
IPL 2022 फायनलमध्ये असं काही घडलं की थेट गिनीज बूकमध्ये नोंद; जय शाहांनी केलं ट्वीट

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) १५९ चेंडूंत १० चौकार आणि १६ चौकारांच्या मदतीने २२० धावा करून नाबाद राहिला. तर संघाच्या ५० षटकांत एकूण ३३० धावा झाल्या. टी २० वर्ल्डकप २००७ मध्ये युवराज सिंग यानं इंग्लंडच्या विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात लागोपाठ सहा षटकार ठोकले होते. त्याआधी रवी शास्त्री यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळताना हा कारनामा केला होता. आता गायकवाड यानं एका षटकात ७ षटकार खेचून इतिहास रचला आहे. (Sports News)

Ruturaj Gaikwad Sixes/BCCI Domestic
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची PCBची कुवत नाही, रमीज राजांना पाकिस्तानच्याच माजी खेळाडूनं ठणकावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com