Viral Cricket Video: अरे भाई भाई.. भावानेच केला घात; पोट धरून हसवणारा VIDEO एकदा पाहाच

Funny Run Out In Cricket: सोशल मीडियावर एका रन आउटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, जो तुम्हाला हसायला भाग पाडेल.
viral cricket video
viral cricket videoyoutube

Funny Moment In Cricket: सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. २०१९ वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

तो व्हिडिओ होता एमएस धोनीच्या रन आउटचा. या रन आउटमुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला होता. हा एक आयकॉनिक रन आउट ठरला होता.

हा रन आऊट अनेकांना रडवणारा होता. मात्र सोशल मीडियावर एका रन आउटचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, जो तुम्हाला हसायला भाग पाडेल. (Latest sport updates)

viral cricket video
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंडरआर्म क्रिकेटचा सामना सुरू आहे. त्यावेळी गोलंदाज चेंडू टाकतो, जो फलंदाजाच्या पायाला जाऊन लागतो. त्यावेळी नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाला धाव पूर्ण करायची असते.

मात्र स्ट्राईकवर असलेला फलंदाज असं काहीतरी करतो जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तर झाले असे की, चेंडू पायाला लागताच नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज धाव घेण्यासाठी धावतो. त्याचवेळी स्ट्राईकला असलेला फलंदाज धाव घेण्याचं सोडून तो चेंडू उचलून गोलंदाजाकडे फेकतो.

गोलंदाजही संधीचं सोनं करत त्या फलंदाजाला धावबाद करतो. म्हणजे आपल्याच संघातील खेळाडूने आपल्याच संघातील खेळाडूला बाद केलं. या रन आउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अंडरआर्म क्रिकेटची वाढती लोकप्रियता..

अंडरआर्म क्रिकेटची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बॉक्स क्रिकेट या खेळाबद्दल आधी खूप कमी लोकांना माहित होतं, हा खेळ मुंबईत सुरु झाला होता.

मात्र आता या बॉक्स क्रिकेटची लोकप्रियता इतकी वाढत चालली आहे की, हा खेळ आता जगातील कान्याकोपऱ्यात खेळला जातो. या स्पर्धेचं बक्षीसही लाखांमध्ये असतं. येणारा काळात बॉक्स क्रिकेटचा क्रेझ आणखी वाढणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com