HBD Vamika Kohli: असाही योगायोग! मुलीच्या वाढदिवशी कोहली खेळणार सामना

वामिका कोहलीचा (Vamika Kolhi) आज पहिला वाढदिवस आहे. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराटच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. वर्षभरानंतरही विराट आणि अनुष्काने वामिकाचा चेहरा मीडियासमोर उघड केलेला नाही.
HBD Vamika Kolhi
HBD Vamika KolhiSaam Tv

नवी दिल्ली - विराट कोहलीसाठी 11 जानेवारी 2022 चा दिवस खास आहे कारण आज विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिकाचा वाढदिवस आहे. वामिका कोहलीचा (Vamika Kohli) आज पहिला वाढदिवस आहे. विराट आणि अनुष्काचे लाखो चाहते आहेत. वर्षभरानंतरही विराट आणि अनुष्काने वामिकाचा चेहरा मीडियासमोर उघड केलेला नाही. आजपर्यंत वामिकाचा फक्त मागचा फोटो समोर आला आहे. घरामध्ये मुलांचे पाय खूप शुभ असतात असे म्हणतात. विराट आणि अनुष्कासोबतही असंच काहीसं घडलं आहे. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराटच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. (HBD Vamika Kohli)

हे देखील पहा -

दरम्यान, आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खूप खास असणार आहे. कारण आजचा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 99वी कसोटी असेल. या सामन्यापूर्वी कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:च्या फिटनेसबाबद मोठे अपडेट दिली आहे.

HBD Vamika Kolhi
Baramati Crime: अंगणात कोंबड्या आल्याच्या रागातून महिलेची कुऱ्हाडीने हत्या; पहा व्हिडिओ

कोहलीचा हा अपडेट भारतीय कॅम्पसाठी दिलासा देणारा आहे. यासोबतच त्याने मोहम्मद सिराजच्या दुखापतीबाबतही अपडेट दिले आहे. कोहली म्हणाला, "सिराजला कसोटी सामन्यात खेळणार नाही. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. आम्ही वेगवान गोलंदाजासोबत धोका पत्करू शकत नाही.” विराट कोहलीसाठी आजचा सामना खूप खास असणार आहे कारण आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यालाही हा कसोटी सामना जिंकून आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवायची आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com