विराट कोहली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; LGBTQIA+ समाजाने 'यामुळे' घेतला आक्षेप...

"LGBTQIA+ समाजाला विराटची मालकी असलेल्या वन ८ कम्यून रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारला जातो" असा आरोप या 'येस, वी एक्झिस्ट' या संस्थेनं केला आहे.
विराट कोहली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; LGBTQIA+ समाजाने 'यामुळे' घेतला आक्षेप...
विराट कोहली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; LGBTQIA+ समाजाने 'यामुळे' घेतला आक्षेप...Saam Tv

भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या खेळाव्यतिरिक्त आपल्या स्टाईलनेही चर्चेत असतो. मात्र सध्या तो एक नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. विराटची मालकी असलेल्या वन ८ कम्यून ही रेस्तराँ चेन सध्या वादाचं कारण ठरली आहे. "LGBTQIA+ समाजाला विराटच्या वन ८ कम्यून रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारला जातो" असा आरोप या 'येस, वी एक्झिस्ट' या संस्थेने केला आहे. @yesweexistindia या इंस्टाग्राम पेजवरुन हा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांनी विराटला यात लक्ष घालण्याचं आव्हान केलं आहे. (Virat Kohli again in the midst of controversy; LGBTQIA + community objected to 'this')

हे देखील पहा -

काय आहे नेमकं प्रकरण?

विराटची मालकी असलेल्या वन ८ कम्यून या रेस्तराँमध्ये LGBTQIA समाजातल्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. भिन्नलिंगी जोडपी किंवा महिला आणि पुरुषांनाच या रेस्तराँमध्ये प्रवेश दिला जातो असा आरोप 'येस, वी एक्झिस्ट' या संस्थेने केला आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार पुण्यातल्या शाखेत हा भेदभाव केला जात आहे. दिल्लीतल्या शाखेला संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं येस, वी एक्झिस्ट या पेजचं म्हणणं आहे.

या प्रकाराचा 'येस, वी एक्झिस्ट' पेजनं निषेध केला आहे. तसेत विराटने यात लक्ष देण्याचं आव्हान केलं आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ते विराटला म्हणाले की, "विराट कोहली, तुला माहित नसेल पण तुझं पुण्यातलं वन८ कम्यून हे रेस्तराँ LGBTQIA ग्राहकांसोबत भेदभाव करत आहे. इतर शाखांचंही असंच धोरण आहे. हे अनपेक्षित आणि अस्वीकार्य आहे. तुम्ही या धोरणात लवकरात लवकर बदल कराल अशी आशा आहे. एकतर रेस्तराँची भूमिका बदला किंवा अशा प्रकारे भेदभाव करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन काम करणे टाळा." असं आव्हान येस, वी एक्झिस्ट या संस्थेने विराटला केलं आहे.

वन ८ कम्यून चं म्हणणं काय आहे?

वन ८ कम्यून या रेस्तराँच्या पुण्यातील शाखेचे प्रमुख अमित जोशी हे म्हणाले की, "आम्ही लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही. आमच्याकडे स्टॅग एन्ट्रीवर निर्बंध आहेत. हे केवळ आवारात उपस्थित असलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आहे."

विराट कोहली पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; LGBTQIA+ समाजाने 'यामुळे' घेतला आक्षेप...
'ती' घड्याळं दीड कोटीची अन् जप्त झाली नाहीत; हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण

एलजीबीटी+ समूह म्हणजे कोण?

यात समलिंगी मुली अर्थात लेस्बियन, समलिंगी मुलं अर्थात गे, उभयलिंगी मुलं आणि मुली अर्थात बायसेक्शुअल, ट्रान्सजेण्डर अर्थात भारतीय संदर्भात तृतीयपंथ आणि ‘+’ च्या खुणेत येणारे इतर अनेक. या अलायन्समध्ये सोबत असलेले, जेन्डर फ्ल्युइड अर्थात ज्यांची लैंगिकता बदलत राहते असे, असेक्शुअल अर्थात ज्यांना कुठलंही लैंगिक आकर्षण नसतं असे, पॅनसेक्शुअल अर्थात असे की ज्यांना सगळ्याच लैंगिकतेचं आकर्षण असतं.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com