Virat Kohli Reaction On Vamika Picture: वामिकाचा फोटो लीक झाल्यावर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या वनडेमध्ये अनुष्का-वामिका दिसले होते, आता विराट कोहलीने या चित्राबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli Reaction On Vamika Picture: वामिकाचा फोटो लीक झाल्यावर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Virat Kohli Reaction On Vamika PictureInstagram/@virat.kohli

Virat Kohli Reaction On Vamika Picture: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या ODI सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला आहे, मात्र या सामन्यातील माजी कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकाची (Vamika Kohli) पहिली झलक व्हायरल झाली आहे. हा फोटो गेल्या दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर स्वतः विराट कोहलीने (Virat Kohli) एक निवेदन जारी केले आहे.

Virat Kohli
Virat KohliInstagram/@virat.kohli

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, काल आमच्या मुलीचा फोटो स्टेडियममध्ये क्लिक करण्यात आला आणि तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आम्‍ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, आम्‍हाला असावधेनतेने पकडण्‍यात आले आणि कॅमेऱ्याची नजर आमच्यावर होती हे आम्हाला कळले नाही.

विराट कोहली पुढे म्हणाला की, मुलीच्या चित्राबाबत आमची भूमिका पूर्वीसारखीच आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही वामिकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करू नये. त्यामागचे कारण आधी सांगितल्याप्रमाणेच आहे, धन्यवाद.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वनडे रविवारी खेळला जात होता, त्यावेळी विराट कोहलीने आपले अर्धशतक (Half Century) पूर्ण केले. यादरम्यान विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुलगी वामिकासह स्टँडमध्ये उपस्थित होती.

अनुष्का शर्मा आणि वामिका या विराटला चिअर्स करत होत्या, त्यानंतर विराट कोहलीनेही बॅट स्विंग केल्यासारखी प्रतिक्रिया दिली. बस्स, आणि मग काय या दोघांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर आगीसारखी पसरली. (Virat Kohli Reaction On Vamika Picture)

Virat Kohli Reaction On Vamika Picture
हौसेला मोल नाही! मजुराने थाटामाटात साजरा केला गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

कोहली आणि अनुष्काने यापूर्वीच आवाहन केले आहे;

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका या जानेवारीत एक वर्षाची झाली आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी याआधीही प्रत्येकाला आपल्या मुलीचे फोटो काढू नका, असे आवाहन केले होते, जोपर्यंत ती (वामिका) स्वत: इतकी मोठी होत नाही की तिला या गोष्टी समजू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना ते टाळायचे आहे असे या दोघांनीही स्पष्ट सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com