Virat Kohli Batting Class: एखाद्या कवितेसारखे आहेत विराट कोहलीचे हे 2 षटकार! 'हे' नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

Virat Kohli Batting: विराट कोहलीने हैदराबादविरुद्ध अतिशय आकर्षक शॉट्स खेळले. परंतु त्यातील अनेक शॉट असे होते जे एकदा पासून तुमचं मन भरणार नाही.
Virat Kohli Batting Class
Virat Kohli Batting Classsaam tv

Virat Kohli Batting Class : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यात आहे. शेवटचे काही सामने शिल्लक असताना ही स्पर्धा अधिक रोमांचक होत चालली आहे. गुरुवारी रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) जबरदरस्त खेळी करत शतक झळकावलं हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतलं सहावं शतक ठरलं. यासह विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

या सामन्यादरम्यान विराट कोहलीने अतिशय आकर्षक शॉट्स खेळले. परंतु त्यातील अनेक शॉट असे होते जे एकदा पासून तुमचं मन भरणार नाही. तुम्ही वारंवार ते शॉट्स पाहात राहाला. विराटच्या बॅटचा फ्लो एवढा स्मूद होता की ते कॉमेंटेटर्स देखील त्याचं कौतुक करताना थकले नाही. विराटच्या या खेळीवर प्रभावित होऊन आयसीसीने (ICC) त्याच्या यापूर्वीच्या एका खेळीतील दोन शॉट्सचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला 'पोएट्री इन मोशन' असे कॅप्शन दिले आहे.

Virat Kohli Batting Class
Virat Kohli Six: केवळ टायमिंग अन् क्लास! किंग कोहलीने जागेवरून खेचला १०३ मीटरचा षटकार, डू प्लेसिसची Reaction व्हायरल - VIDEO

किंग कोहलीने अशाच कलात्मकतेने कालच्या सामन्यात शॉट्स खेळले. यामुळे आयसीसीही त्याच्या प्रेमात पडली. आयसीसीने विराटचे कौतुक करताना विराटचे हे शॉट एखाद्या कवितेसारखे असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीची ही अप्रतिम फलंदाजीची शैली यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

आयपीएल 2023 चा 65 वा सामना गुरुवारी खूपच मनोरंजक होता. किंग कोहलीने शतक झळकावत अनेक विक्रम मोडले. त्याच्या आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) शतकी भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. या समान्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 5 गड्यांच्या बदल्यात 186 धावांचा स्कोअर केला. त्याचा पाठलाग करताना आरसीबीने 19.2 षटकात 2 गड्याच्या बादल्यात विजय मिळवला. (Latest Sports News)

Virat Kohli Batting Class
Virat Kohli Records: 'किंग कोहलीचा दरारा! काल पण आणि आज पण..,शतकी खेळी करत मोडले 'हे' रेकॉर्डस्..

प्रेक्षकांना दोन शतकांची पर्वणी

विशेष म्हणजे या सामन्यात दोन खेळाडूंनी शतकं झळकावली. विराटच्या आधी हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने जबरदस्त शतकी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. परंतु त्याच्या शतकावर विराट कोहली आणि फाफ डुप्लेसी यांनी केलेली मोठी भागीदारी भारी पडली. किंग कोहलीने 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची खेळी केली. कोहली बर्‍याच दिवसांनंतर आपल्या लयीत परतला आहे. चाहते त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com