विराट कोहली बाबत आलेल्या तक्रारीच्या बातम्यांवर BCCIचं स्पष्टिकरण

भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाची चर्चा सातत्याने होत होती.
Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार
Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणारSaam Tv

भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाची चर्चा सातत्याने होत होती. त्याने विश्वचषकानंतर टी -20 (T-20 World Cup) मधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. मागच्या दोन दिवसांपासून माध्यमांत बातमी फिरत होती की टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी कोहलीविरोधात बीसीसीआयकडे (BCCI) तक्रार केली आहे. त्यावर बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्टिकरण दिले आहे.

माध्यमांशी बोलताना धुमल म्हणाले, "प्रसारमाध्यमांनी अशा बकवास गोष्टी लिहिणे बंद केले पाहिजे. मी ही गोष्ट सांगतो की प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर आहे की कोणत्याही क्रिकेटपटूने BCCI ला लेखी किंवा तोंडी संपर्क साधलेला नाही." त्यामुळे बीसीसीआय अशा सर्व खोट्या अहवालांचे उत्तर देऊ शकत नाही. पुढे ते म्हणाले मी एका अहवाल दुसऱ्या दिवशी पाहिला की टी 20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात बदल केला जाऊ शकतो. शेवटी असे कोणी म्हटले? असा प्रश्न धुमाळ यांनी विचारला आहे.

Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार
IPL 2021: प्लेऑफ गाठण्यासाठी संघांची काय आहेत गणितं?

ते पुढे म्हणाले, "टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्याबद्दल ते म्हणाले विराटने स्वत: ही याची घोषणा केली आहे. कल्पना आहे की त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्याला नेहमी त्याला जे करायचे आहे ते करायला आवडते. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय होता.

"मला माध्यमांनी विचारले की बीसीसीआयने कोहलीबाबत काही निर्णय घेतला आहे का. तेव्हा मी म्हणालो बीसीसीआयने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही आणि ना काही चर्चा केली आहे. हा सर्वस्वी विराटचा निर्णय होता आणि त्याने तो बीसीसीआयला सांगितला होता. ते शेवटी बोलताना म्हणाले मी बोर्डाच्या वतीने सांगतो की आमच्याकडे असे कोणतेही निवेदन किंवा तक्रार आलेले नाही त्यामुळे मीडियाने या अफवा चालवणं बंद करावं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com