'वो मेरी जिंदगी नहीं जी सकते’! विराटच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय?

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
Virat Kohli
Virat KohliSaam TV

विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबद्दल प्रत्येकजण चर्चा आणि चिंता व्यक्त करत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून विराट कोहलीचा फॉर्म खराब सुरु आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. कारण या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि भारतीय संघाचा (Team India) माजी कर्णधार अस पहिल्याच चेंडूवर तीनवेळा खाते न उघडता बाद झाला आहे. असे झाल्यावर सगळेच कोहलीच्या फॉर्मबद्दल चर्चा करणारच. विराट कोहलीला याची जाणीव आहे, पण टीकाकारांना त्याची स्थिती माहीत नाही, असे म्हणत त्याने आपल्या ओळखीच्या शैलीत याचे वर्णन 'बाहरी शोर' असे केले आहे. या सगळ्यापासून दूर कसे राहायचे हे त्याला माहीत असल्याचे कोहली म्हणाला.

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी कोहलीची एकच चिंता होती की तो मोठी खेळी खेळू शकला नाही, शतक करू शकला नाही, पण या मोसमात ही कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. अनेकांनी कोहलीने काही काळ विश्रांती घ्यावी आणि नंतर पुनरागमन करावे, असेही सल्ले दिले. कोहलीने T20 मधून निवृत्ती घ्यावी असेही काही रिपोर्ट्समध्ये लिहिले गेले आहेत.

Virat Kohli
Cyclone Asani: 'असानी' चक्रीवादळाने दिशा बदलली, 5 जिल्ह्यांना हाय अलर्ट

कोहलीचे टीकाकारांना प्रत्युत्तर

कोहलीच्या फलंदाजीबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, कोहलीला या अगोदर त्याच्या कर्णधारपदाबद्दल टीका किंवा सूचनांना सामोरे जावे लागले आहे. आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला की, ''जे त्याच्याबद्दल बोलत आहेत त्यांना त्याची स्थिती समजू शकत नाही. कोहली म्हणाला, ते (समीक्षक) माझ्या जागी येऊ शकत नाहीत. मला जे वाटत आहे ते त्यांना जाणवू शकत नाही. ते माझे आयुष्य जगू शकत नाहीत, हे क्षण ते जगू शकत नाहीत. असा आवाज कसा थांबवायचा? तुम्ही एकतर टीव्ही म्यूट करा किंवा त्यांचे ऐकू नका किंवा लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. मी या दोन्ही गोष्टी करतो."

कोहलीचा अलीकडचा काळ त्याच्यासाठी कठीण गेला आहे आणि तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे. या मोसमात 12 डावात त्याला केवळ एका अर्धशतकासह 216 धावा करता आल्या आहेत. त्याने स्वतःही कबूल केले की तो खाते न उघडता सलग दोन डावांत ज्या प्रकारे बाद झाला, तो त्याच्या आयुष्यात कधीच घडला नाही आणि क्रिकेटने त्याला जे शक्य आहे ते दाखवून दिले आहे. अशा स्थितीत या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये कोहली दमदार खेळीद्वारे पुनरागमन करण्याचा तसेच चांगल्या पद्धतीने शेवट करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com