The King is Back ! विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर चाहत्यांमध्ये संचारला उत्साह

The King is Back ! विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर चाहत्यांमध्ये संचारला उत्साह
Virat kohlisaam tv

मुंबई : आयपीएलच्या २०१६ (IPL 2022) च्या मोसमात चार शतकं ठोकून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) टी-२० मध्ये नवा विक्रम केला. त्यानंतर विराट T-20 क्रिकेटचा किंगच बनला. मात्र, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला यंदाच्या हंगामात गेल्या काही सामन्यांमध्ये शतक तर दूरच अर्धशतकाचाही सूर गवसला नव्हता. परंतु, आज मुंबईत ब्रेब्रॉन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सविरोधात (Gujrat titans) आरसीबीचा (RCB) सामना झाला. या सामन्यात विराटने चमकदार कामगिरी केलीय. गेल्या आठ सामन्यांमध्ये एकदाही अर्धशतकी खेळी न कलेल्या विराटने अखेर गुजरातच्या गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं. विराटने गेल्या दोन सामन्यांमध्ये खातंही उघडलं नव्हतं. त्यानंतर विराटच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. गुजरातच्या विरुद्ध विराटने केलेल्या दमदार कामगिरीमुळं त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला.

आयपीएलच्या १५ व्या पर्वात आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी विराट कोहलीचा फॉर्म कायम राहणे आरसीबीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. विराटने ४५ चेंडूत ५० धावा केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरणं निर्माण झालं आहे. विराटने ठोकलेल्या अर्धशतकानंतर संपूर्ण आरसीबीच्या टीमनं आणि कुटुंबातील सदस्यांनी विराटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

विराट कोहलीबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं सूचक वक्तव्य केलं होतं. विराटच्या मनात काय चाललंय हे मला माहित नाही. पण मला त्याच्यावर विश्वास आहे. विराट महान खेळाडू आहे. विराट लवकरच चांगल्या फॉर्ममध्य येईल आणि धावांचा ओघ सुरु होईल. असं गांगुली म्हणाला होता. त्यामुळे गांगुलीनं विराटवर ठेवलेला विश्वास अखेर सार्थ ठरला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com