Virat Kohli Helicopter Shot: विराटचं असं 'रौद्ररूप' कधीच बघितलं नसेल; धोनी स्टाइल हेलिकॉप्टर शॉट, VIDEO

India Vs Sri Lanka वनडे सामन्यात विराट कोहलीनं धोनी स्टाइल हेलिकॉप्टर शॉट खेचला, व्हिडिओ होतोय व्हायरल.
Virat Kohli Helicopter Shot
Virat Kohli Helicopter ShotSAAM TV

Virat Kohli MS Dhoni Helicopter Shot Video : भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली पुन्हा लयीत आला आहे. त्याचा फॉर्म बघता तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा वनडेतील शतकांचा विक्रम सहज मोडीत काढेल. श्रीलंकेविरुद्ध तर त्याची बॅट तळपत आहे. वनडे मालिकेत त्यानं तर दोन शतके ठोकली आहेत. तसेच तो सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरीही ठरलाय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं वनडे मालिकेत श्रीलंकेला ३-० ने क्लीन स्वीप दिला. या मालिकेतील तिसरा सामना तिरुवअनंतपुरममध्ये रविवारी झाला. त्यात भारतीय संघानं (Team India) वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीचा जलवा बघायला मिळाला. कोहलीने वनडे कारकीर्दीतील ४६ वं शतक साजरं केलं.

'विराट' हेलिकॉप्टर शॉट व्हायरल

विराट कोहलीनं या सामन्यात ११० चेंडूंत १६६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात त्याने ८ उत्तुंग षटकार आणि १३ चौकार ठोकले. या खेळीत त्यानं माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्टाइलने उत्तुंग हेलिकॉप्टर शॉट लगावला. या फटक्याची ताकद इतकी होती की चेंडू ९७ मीटर दूर जाऊन पडला.

कोहलीनं तडकावलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. कोहलीनं हा हेलिकॉप्टर शॉट डावाच्या ४४ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लगावला. कुसन रजिथा गोलंदाजी करत होता. हा फटका खेळल्यानंतर विराटलाही आश्चर्य वाटलं.

इतक्या दूर चेंडू जाईल, यावर त्याचा स्वतःचा विश्वास बसला नाही. कॉमेंटेटर्स सुद्धा विराटच्या या शॉटचं कौतुक करताना या व्हिडिओत दिसतात. तर नॉन स्टाइकला असलेल्या श्रेयसला स्वतः विराट हा माही शॉट असल्याचं सांगताना दिसतोय. (Sports News)

Virat Kohli Helicopter Shot
Ind vs SL ODI Series: कोहली काही थांबेना! श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; नावावर केले 2 विराट रेकॉर्ड
Virat Kohli Helicopter Shot
Virat Kohli: लालची कोहली! कर्णधारपदासाठी थेट धोनीशी नाते संपवणार होता विराट, आत्मचरित्रातून झाला धक्कादायक खुलासा

शतकानंतर कोहलीचं असं रूप कधीच बघितलं नाही

विराट कोहलीनं धोनी स्टाइल हेलिकॉप्टर शॉट लगावला त्याआधीच त्याचं शतक पूर्ण झालं होतं. कोहली १०१ धावांवर खेळत असतानाच हा फटका तडकावला. शतकानंतर कोहली अधिकच आक्रमक झालेला दिसला. याआधी त्याचं असं रूप क्वचितच बघायला मिळालं असेल. ४५ व्या षटकात तर कोहलीनं चमिका करुणारत्नेला लागोपाठ दोन षटकार खेचले.

कोहलीनं या मालिकेत तीन वनडे सामन्यांत सर्वाधिक २८३ धावा केल्या. यात त्याची दोन शतके आहेत. कोहलीची नाबाद १६६ धावांची सर्वोत्तम खेळी ठरली. कोहली या मालिकेतील 'हिरो' ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com