IND vs ENG: चौकार ठोकून कोहलीने रचला रेकॅार्ड; असे करणारा तिसरा खेळाडू

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे.
IND vs ENG: चौकार ठोकून कोहलीने रचला रेकॅार्ड; असे करणारा तिसरा खेळाडू
IND vs ENGSaam Tv

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात चौकार ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 23,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

त्याने आपल्या डावाच्या 13 व्या चेंडूवर शानदार चौकार मारला. त्याने जेम्स अँडरसनच्या चेंडूवर चौकार मारून आपले खाते उघडले तसेच आपल्या 23,000 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 440 व्या सामन्यात हे यश मिळवले.

IND vs ENG
IND vs ENG: कोट्यावधीच्या बेटिंग रॅकेटचा भांडाफोड; असे लुटत होते लोकांना

कोहलीने 23,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या

विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या 440 व्या सामन्यात 23,000 धावा पूर्ण केल्या आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 664 सामन्यांमध्ये 34,357 धावा केल्या, तर राहुल द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने 504 सामन्यांमध्ये 24,064 धावा केल्या आहेत. विराट कोहली सचिन आणि द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com