Roger Federer : सर्वोत्तम ! फेडरर - नदालच्या 'त्या' छायाचित्रावर कोहली भावूक

फेडरर आणि नदाल यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Roger Federer , Rafal Nadal , Virat Kohli, Social Media, Tweet
Roger Federer , Rafal Nadal , Virat Kohli, Social Media, Tweetsaam tv

Roger Federer Farewell : रॉजर फेडररला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात (tennis) (लेव्हर कप) फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर फेडरर निरोपाच्या वेळी रडू लागला. एवढेच नाही तर फेडररसोबत त्याच्याविरुद्ध खेळलेला नदालही (rafael nadal) भावुक झाला हाेता. फेडरर आणि नदाल एकत्र रडत हाेते. या दोघांचे छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले.

नदाल आणि फेडररचे हे छायाचित्र टीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने देखील ट्विट केले आहे. तसेच कोहलीने आपल्या ट्विटमध्ये फेडररसोबत नदालचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम छायाचित्र असल्याचे म्हटलं आहे.

Roger Federer , Rafal Nadal , Virat Kohli, Social Media, Tweet
पुणे नवरात्रौ महोत्सव २०२२ : प्रमुख मान्यवरांच्या मांदियाळीत उत्सव रंगणार, वाचा सविस्तर

कोहलीने आपल्या ट्विटमध्ये विशेष भावना व्यक्त केल्या आहेत. काेहली म्हणताे प्रतिस्पर्धी खेळाडूंना एकमेकांबद्दल इतकं प्रेम असू शकतं ही गाेष्ट विचार करण्यापलीकडची आहे. हेच खेळाचे वैशिष्टय असल्याचे काेहलीने नमूद केले आहे. माझ्यासाठी हे खेळातील सर्वाेत्तम छायाचित्र आहे. तुमचा साथीदार तुमच्यासाठी रडताेय तेव्हा तुम्हाला कळते की ही देवानं तुम्हांला दिलेली प्रतिभा का दिली गेली आहे. काेहलीने दाेन्ही खेळाडूंचा खूप आदर वाटताे असंही म्हटलं आहे.

रॉजर फेडररचा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याशी झाला. या सामन्यात 4-6, 7-6(2), 11-9 असा राॅजरचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर फेडररसह सर्वजण भावूक झाले हाेते. त्याला सर्वांनी भावनिक निरोप दिला.

Roger Federer , Rafal Nadal , Virat Kohli, Social Media, Tweet
Kass : तिढा सुटला; राजेंची मागणी मान्य, कास पठार ई बस 'येथून' धावणार

दरम्यान फेडरर आणि नदाल यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. आपल्या कारकिर्दीत फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकण्यात यश मिळवले आहे. या बाबतीत राफेल नदाल अव्वल स्थानावर आहे, ज्याच्या नावावर 22 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे.

Edited By : Siddharth Latkar

Roger Federer , Rafal Nadal , Virat Kohli, Social Media, Tweet
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com