IPL 2023 : विराट कोहलीच्या RCB संघाला मोठा झटका; 3.2 कोटीला खरेदी केलेला खेळाडू संघाबाहेर, कारण?

विराट कोहलीच्या आरसीबी संघाला मोठा झटका बसला आहे.
Virat Kohli
Virat KohliSaam TV

Virat Kohli News : विराट कोहलीच्या आरसीबी संघाला मोठा झटका बसला आहे. डिसेंबर २०२२ आयएपीएलच्या लिलावात ३.२ कोटीला खरेदी केलेल्या इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्सला दुखापत झाली आहे. त्यामुळे विल जॅक्सला बांग्लादेश दौरा सोडून मायदेशी परतावं लागणार आहे. (Latest Marathi News)

इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान विल जॅक्सला क्षेत्ररक्षण करताना डाव्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे बांग्लादेश दौऱ्यावरील विल जॅक्सला संघातून विश्रांती दिली आहे. विल लवकरच इंग्लंडला पोहोचून दुखापतीतून बरे होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Virat Kohli
WPL 2023: आधी RCBची केली धुलाई मग मैदानावरच केला भांगडा! २२ वर्षीय जेमिमाचा डान्स पाहून पडाल तिच्या प्रेमात : VIDEO

विल जॅक्सने सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ६ महिन्यांच्या आत विलने तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. गेल्या महिन्यांपासून विल सातत्याने क्रिकेट सामने खेळत आहेत. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौरा, जानेवारीत दक्षिण आफ्रिकेचा टी-२० आणि न्यूझीलंडमध्येही कसोटी सामन्याच्या संघात त्याचं स्थान होतं. मात्र, न्यूझीलंडच्या विरोधात दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी विश्रांती देण्यात आली होती.

Virat Kohli
WPL 2023: शेवटच्या षटकात DRS.. WPLच्या 'या' नव्या नियमामुळे भंगले गुजरातच्या पहिल्या विजयाचे स्वप्न

'आयएपीएल'च्या लिलावात ठरला होता महागडा खेळाडू

विल जॅक्स हा अष्टपैलू खेळाडू आहे. विल हा आयपीएल २०२३ साठीच्या लिलावात महागडा खेळाडू ठरला होता. आयपीएलच्या लिलावात विलची ३.२ कोटी रुपयात खरेदी करण्यात आली होती. आरसीबी संघाची नजर आता विल केव्हा बरा होणार, याकडे असणार आहे.

आयपीएल (IPL) स्पर्धा एका महिन्यावर आली आहे. विल पुढील काही दिवसांत फिट होणार की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. विल जॅक्स आयपीएल स्पर्धेतून बाहेर गेल्यास विराट कोहली (Virat Kohli) आणि आरसीबीला मोठा धक्का मानला जाऊ शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com