Virat Kohli: विराटच्या ‘त्या’ क्लासिकल शॉटने वेधले सर्वांचे लक्ष, पाहून तुम्हालाही आठवेल मास्टर ब्लास्टर- VIDEO

विराट कोहलीने एक अप्रतिम शॉट मारला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Virat kohli
Virat kohli Twitter

Virat kohli straight drive: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने देखील जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना विराट कोहलीने एक अप्रतिम शॉट मारला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

Virat kohli
IND VS AUS 4th test: अहमदाबादमध्येही गिलची त्सुनामी! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत झळकावले वादळी शतक

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र रोहित शर्मा ३५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलने भारतीय संघाचा गाडा पुढे ढकलला.

पुजाराने ४२ धावांचे योगदान दिले. तर शुभमन गिल शतकी खेळी करून अजूनही मैदानावर टिकून आहे.

Virat kohli
IND VS AUS 4th test: हिटमॅन इज बॅक! जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; तेच करत हिटमॅनने रचला इतिहास

पुजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. या डावातील ७३ वे षटक सुरु असताना मिचेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने अप्रतिम स्ट्रेट ड्राइव्ह मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केल्या ४८० धावा..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com