श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मजुरीची वेळ

कोरोना पूर्वीच्या काळात खासगी कोचिंग क्लासेस घेऊन स्नेहा ढेपे यांनी स्वतःचा आणि तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविला. मात्र कोरोना साथीत सेन्हा हिचे पती मृत्यू मुखी पडले.
श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मजुरीची वेळ
श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मजुरीची वेळSaam TV

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी हाती मिळेल ते काम करण्याची वेळ ओढवली आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या स्नेहा ढेपे ह्या देखिल कुरवड्या - पापड बनवून विकण्याचा व्यवसाय करत आहेत. राज्य सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना बसतोय. औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या तसेच तलवार बाजीच्या उत्तम खेळाडू असलेल्या स्नेहा ढेपे  यांच्यावर देखील स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुरवड्या - पापड बनवून विकण्याची वेळ ओढवली आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजला जाणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी 2009 -10 मध्ये  स्नेहा ढेपे यांची निवड झाली.  मात्र त्यांना 2013 - 14 ला राज्य सरकार कडून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळायला चार वर्षाचा वेळ लागला. मात्र, पुरस्कार मिळून सात वर्ष लोटल्यानंतरही स्नेहा ढेपे यांना शासकीय कोट्यातील नोकरी मिळाली नाही. कोरोना पूर्वीच्या काळात खासगी कोचिंग क्लासेस घेऊन स्नेहा ढेपे यांनी स्वतःचा आणि तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविला. मात्र कोरोना साथीत सेन्हा हिचे पती मृत्यू मुखी पडले.

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मजुरीची वेळ
औरंगाबादमध्ये '30-30' घोटाळा !; भरघोस व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक

घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तिच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली. राज्य शासनाकडे आपल्या हक्काच्या कोट्यातील नोकरी मिळावी यासाठी स्नेहा आणि तिचे इतर पुरस्कार विजेते सहकारी गेल्या सात-आठ वर्षांपासून शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहेत. मात्र लाल फितीच्या कारभारात स्नेहा आणि तिच्या सारख्या इतर छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूना फक्त आश्वासन आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. लाल फितीच्या कारभारात चंपला झिजवून देखील नोकरी मिळत नसल्याने, स्नेहा आणि तिच्या इतर सहकारी पुरस्कार विजेत्यांनी आता बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालय कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आम्ही खेळाडू झालो, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली.... ! याची आता आम्हालाच खंत वाटत आहे असं स्नेहा ढेपे यांचं म्हणणं आहे

राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेत्या खेळाडूंना जर सरकार कडून त्यांचे हक्क मिळत नसतील, तर यापुढे राज्यात चांगले खेळाडू कसे तयार होतील, देश आणि राज्यासाठी मेडल कोण आणतील असा सवाल या पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पडला आहे. खेळाडू बद्दल सरकारचे धोरण असेच उदासीन असतील तर राज्यात कधीच चांगले खेळाडू तयार होणार नाहीत, आपल्या मुलांना कुणीही क्रीडा क्षेत्रात पाठवणार नाहीत अशी भीती स्नेहा ढेपे यांना सतावत आहे.

सेन्हा ही फक्त एकटी पुरस्कार विजेती खेळाडू नोकरीच्या प्रतीक्षेत नसून, तिच्या सारखे जवळपास 140 पुरस्कार विजेते खेळाडू आज आपल्या न्यायीक मागन्यासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. इतर राज्यात ज्या पद्धतीने खेळाडू ना पुरस्कार देताना च नोकरी च आदेश देखिल दिल जाते नेमक तशाच प्रकारे राज्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडू ना देखिल पुरस्कार देतानाच नोकरीच आदेश देखील देण्यात यावं अशी मागणी हे पुरस्कार विजेते खेळाडू करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com