VIDEO : भावनेच्या भरात पाकिस्तानी गोलंदाजाने केली हद्दच पार! विकेट घेताच फलंदाजाला केलं किस

या सामन्यातील वाहब रियाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
Wahab Riaz
Wahab RiazTwitter

PSL 2023: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळाले आहे. बुधवारी या स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला विजयसाठी २४१ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र जेसन रॉयच्या तुफानी खेळीच्या बळावर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने या सामन्यात जोरदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील वाहब रियाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

Wahab Riaz
IND vs AUS 4th Test: पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत सामन्याला उपस्थित राहणार; कॉमेट्री देखील करण्याची शक्यता

ही घटना क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाची फलंदाजी सुरु असताना घडली. तिसरे षटक टाकण्यासाठी वाहब रियाज गोलंदाजीला आला होता. वाहब रियाजच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असलेल्या मार्टिन गप्टिलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू हवेत गेला. त्यावेळी वाहब रियाजने धावत जाऊन झेल टिपला. हा झेल टिपल्यानंतर तो मार्टिन गप्टिलला किस करताना दिसून आला.

Wahab Riaz
IND VS AUS 4th test: चौथा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया इतिहास रचणार! जगातील कुठल्याच संघाला न जमलेला पराक्रम करण्याची संधी

मार्टिन गप्टिलला बाद केल्यानंतर वाहब रियाज आनंद साजरा करताना दिसून आला. मात्र त्यानंतर त्याची जोरदार धुलाई झाली. ४ षटक गोलंदाजी करत त्याने ५६ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याची इकोनाॅमी १४ ची होती. वाहब रियाज सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पेशावर जाल्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. या संघाकडून कर्णधार बाबर आजमने ११५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून जेसन रॉयने १४५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com