IPL 2021 : वॉशिंग्टन सुंदरला वगळले; RCB ने निवडलं या खेळाडूस

IPL 2021 : वॉशिंग्टन सुंदरला वगळले; RCB ने निवडलं या खेळाडूस
washington sundar

बंगळूरु : आयपीएल २०२१ च्या दुस-या टप्प्याच्या ipl 2021 second phase प्रारंभीच विराट काेहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) RCB संघास मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. वाॅशिंगटनला washington sundar स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या आगामी टी-२० विश्व करंडक स्पर्धेतील सहभागा विषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे. इंग्लंडमध्ये त्याला झालेली बोटाची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या NCA फिटनेस टेस्टही ताे उतीर्ण करू शकला नाही.

वॉशिंग्टनच्या जागी बंगालचा क्रिकेटपटू आकाशदीपला संघात स्थान देण्यात आलेले आहे. त्याबाबतची घाेषणा आरसीबीने ट्विट करुन केली आहे. आरसीबीच्या संभाव्य संघात विराट कोहली (कर्णधार), अब डिव्हिलियर्स, चहल, सिराज, देवदत्त जॅमीसन, मॅक्सवेल, हसरंगा, चमिरा, टीम डेव्हिड, ख्रिश्चन, जॉर्ज गार्टन, हर्षल, एस अहमद, सैनी, सुयश, अझरुद्दीन, पवन, सचिन बेबी, केएस भारत, रजत पाटीदार, आकाश दीप यांचा समावेश राहील.

आयपीएलचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना पाच वेळा विजेता राहिलेल्या मुंबई इंडियन्स mumbai indians आणि तीन वेळा विजेता संघ चेन्नई chennai super kings यांच्यात खेळला जाईल. आयपीएलचे उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे २७ दिवसात खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर टी २० विश्व करंडक १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Related Stories

No stories found.