क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधन

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे यांचे आज निधन झाले आहे.
क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधन
क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधनSaam Tv

मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे Vasudeo Paranjape यांचे आज निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते. सुनील गावसकरांना सनी हे त्यांनी टोपननाव दिले होते.

हे देखील पहा-

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे हे वडील आहेत. मुंबई आणि बडोद्याकडून २९ फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या परांजपे यांनी नंतर त्यांचे सर्व आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी वेचले होते. मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या १४ व्या वर्षीच तू भारताकडून खेळणार आहे.

क्रिकेटचे द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड, वासू परांजपे यांचे निधन
मंत्रालयाच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान शेतकऱ्यांचे निधन

पण त्याकरिता विकेटकिंपगपेक्षा बॅटींगवर अधिक फोकस कर, असा सल्ला देखील दिला होता. परांजपे यांचा हा सल्ला द्रविडने अंगी करून घेतला. त्यानंतर पुढे जे घडले, तो इतिहासच घडला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेटचा द्रोणाचार्य हरपला अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com