Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर काय करत आहे मास्टर ब्लास्टर 'सचिन तेंडुलकर', किती आहे एकूण संपत्ती? जाणून घ्या

Sachin Tendulkar Birthday Special: सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय.
sachin tendulkar
sachin tendulkarsaam tv

Sachin Tendulkar Net Worth: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. १२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात क्रिकेट या खेळाला अधिक प्राधान्य दिलं जातं. मात्र भारतात क्रिकेटचा क्रेझ कोणी वाढवला? असा प्रश्न विचारला तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर.(Sachin Tendulkar)

वर्तमानात जे खेळाडू मैदान गाजताय त्यांनी अनेकदा म्हटले आहे की, आम्ही सचिनला फलंदाजी करताना पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar 50th Birthday) आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय.

sachin tendulkar
IPL 2023 : IPL सुरू असतानाच विराट, रोहित अन् धोनीला मोठा धक्का, असं घडलं तरी काय?

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करून बरीच वर्षे झाली आहेत. तरीदेखील तो १०० कोटींच्या अलिशान घरात राहतोय. वर्षाला कोट्यावधींची कमाई करतोय. आता निवृत्तीनंतर त्याच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? हेच या लेखातून जाणून घेणार आहोत.

१०० कोटींच्या घरात राहतो मास्टर ब्लास्टर..(Sachin Tendulkar House In Mumbai)

सचिन आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील एका अलिशान बंगल्यात राहतो. सचिन हा अलिशान बंगला २००७ मध्ये खरेदी केला होता. त्यावेळी या घराची किंमत ३९ कोटी होती. मात्र आता या घराची किंमत १०० कोटीच्या घरात पोहोचली आहे.

यासह त्याचा बीकेसीमध्ये फ्लॅट देखील आहे. या फ्लॅटची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. माध्यमातील वृत्तानुसार सचिनचे केरळमध्ये देखील घर आहे. या घराची किंमत सुमारे ७८ कोटी रुपये इतकी आहे.(Latest sports updates)

sachin tendulkar
Sachin Tendulkar House: 100 कोटींच्या अलिशान बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर',पाहा घराच्या आतील फोटो

निवृत्ती घेतल्यानंतर सचिनचा कमाईचा स्त्रोत? Source of Sachin Tendulkar Earning

सचिन तेंडुलकर हा क्रिकेट खेळत असताना कोट्यावधींची कमाई करायचा. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देखील तो कोट्यावधी रुपयांची कमाई करतोय. सचिन तेंडुलकर हा स्वतः मध्येच एक ब्रँड आहे. तो जाहिराती करून पैसा कमावतो. तसेच त्याने अनेक परदेशी कंपन्यांसह करार देखील केला आहे. तसेच हॉटेल क्षेत्रात देखील त्याने गुंतवणूक केली आहे. मुंबई आणि बंगळुरू येथे त्याची २ रेस्टॉरंट देखील आहेत. यामधून तो दरमहा ४ कोटिंपेक्षा अधिकची कमाई करतो.

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती (Sachin Tendulkar net worth)

माध्यमातील वृत्तानुसार सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही १५० मिलियन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती एकूण १११० कोटी रुपये इतकी आहे. सचिनची स्वतःची टीम देखील आहे. इंडीयन सुपर लीग स्पर्धेत कोची संघाचा मालक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com