
आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताचा संघ दुसऱ्यांदा पाकिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कोलंबोच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये सुपर ४ चा सामना रंगणार आहे. यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ आमने सामने आले होते,त्यावेळी पावसामुळे सामना रद्द झाला होता.
दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला होता. दरम्यान सुपर ४ फेरीतील सामना कुठे आणि कसा पाहता येईल हे थोडक्यात समजून घ्या.
केव्हा रंगणार भारत- पाकिस्तान सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळनूसार दुपारी ३:00 वाजता सुरू होईल. तर २:३० वाजता नाणेफेक होईल.
कुठे होणार हा सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ फेरीतील सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडीयमवर रंगणार आहे.
कुठे पाहता येईल हा सामना?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे.
इथे पाहा फ्री..
भारत -पाकिस्तान सामना आता फ्रीमध्ये देखील पाहता येणार आहे. हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल. मात्र फ्रिची सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी मर्यादीत असणार आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी आहे पाकिस्तानची प्लेइंग ११ (Pakistan Playing 11)
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान (उपकर्णधार), इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रऊफ.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11 Prediction)
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ईशान किशन, हार्दिक पंड्या रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/शार्दुल ठाकुर.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.