IPL 2022: कोण जाणार प्लेऑफमध्ये?, गुजरात-लखनौमध्ये अव्वल स्थानासाठी लढाई

मागच्या सामन्यात गुजरातने लखनैच्या संघाला पराभूत केले होते.
IPL 2022 GT vs LSG
IPL 2022 GT vs LSGSaam TV

मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (GT vs LSG) यांच्यात सामना होणार आहे. दोन्हीही संघ यंदाच्या हंगामात नवीन आहेत. मागच्या सामन्यात गुजरातने लखनैच्या संघाला पराभूत केले होते. लोकेश राहुलच्या (KL Rahul) लखनौ संघाला मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे. गुजरातच्या संघाची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. गुजरातकडे मोहम्मद शमी, राशिद खान सारखे गोलंदाज आहेत.

सध्या आयपीएलचा (IPL 2022) हंगामा रंगात आला आहे. यंदाच्या हंगामात नवीन विजेता मिळणार असे चित्र उभे राहिले आहे. कारण गुजरात, लखनौसोबत राजस्थानचा संघही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबई. चेन्नईसारखे संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडले आहेत.

IPL 2022 GT vs LSG
IPL 2022: एकाच बॉलने लिहीली कोलकाताच्या विजयाची अन् मुंबईच्या परभवाची कथा

लखनौ सुपर जायंट्स

शेवटच्या सलग 4 विजयानंतर संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत राहुलच्या संघाचा उत्साह उंचावलेला आहे, पण गुजरातविरुद्ध लखनौचा अगोदरच्या सामन्यात पराभव झाला होता. त्या सामन्यात गुजरातने लखनौचा 5 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर राहुलच्या संघाने मागे वळून पाहिले नाही. लखनौने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत, आणि 3 गमावले आहेत. पॉईंट टेबलमध्ये लखनौचा संघ अव्वल क्रमांकावर आहे. मात्र त्यांना आपले अव्वल स्थान कायम राखायचे असेल तर गुजरातविरुद्ध विजय आवश्यक आहे.

गुजरात टायटन्स

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात विजयाने केली होती. गुजरातचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून, लखनौला हरवल्यास तो पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर येईल. गुजरातनेही 11 सामने खेळले आहेत, आणि 8 जिंकले आहेत.

संभाव्य संघ

लखनौ: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहसिन खान.

गुजरात: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, प्रदीप संगवान/यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com