Who Is Glenn Phillips: अवघे ७ चेंडू खेळून सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा Glenn Phillips आहे तरी कोण?

Glenn Phillips: ग्लेन फिलिप्स आहे तरी कोण?
glenn phillips
glenn phillipssaam tv

SRH VS RR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने जोरदार कामगिरी करत ४ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने २१४ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या संपूर्ण सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात एकूण ४३१ धावा कुटल्या गेल्या.

यादरम्यान ३ फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र अवघ्या ७ चेंडूंचा सामना करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे.

glenn phillips
K Srikanth On Rohit Sharma: 'हा तर 'नो हिट शर्मा',मी प्लेइंग 11 मध्ये ही..' दिग्गजाची हिटमॅनवर बोचरी टीका

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सनरायझर्स हैदराबाद संघाचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्स. ज्यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाला धावांची गरज होती.

त्यावेळी ग्लेन फिलिप्स फलंदाजीला आला आणि तुफान फटकेबाजी केली. सनरायझर्स हैदराबाद संघाला २ षटकात ४१ धावांची गरज होती. त्यावेळी असे वाटले होते की, सनरायझर्स हैदराबाद संघ हा सामना गमावणार.

मात्र त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ७ चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ३५७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. (Latest sports updates)

glenn phillips
Aiden Markram On SRH Loss: जिंकलेला सामना गमावल्यानंतर SRH चा कर्णधार भडकला! आपल्याच संघावर केला मोठा आरोप

ग्लेन फिलिप्सने सुरुवातीच्या २ चेंडूंवर केवळ ३ धावा केल्या होत्या. मात्र १८ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला आणि ग्लेन फिलिप्स त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडला. या षटकात त्याने ताबडतोड फलंदाजी करत २२ धावा ठोकल्या.

यादरम्यान त्याने षटकारांची हॅट्रीक देखील केली. ग्लेन फिलिप्सच्या या खेळीने सनरायझर्स हैदराबाद संघाला या सामन्यात कमबॅक करून दिले. मात्र ५ व्या चेंडूवर तो झेल बाद होऊन माघारी परतला.

glenn phillips
IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

कोण आहे ग्लेन फिलिप्स?

राजस्थानच्या तोंडचा घास पळवणारा ग्लेन फिलिप्स हा न्यूझीलंड संघाकडून खेळतो. यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडतो. न्यूझीलंड संघासाठी खेळताना त्याने ५९ टी -२० सामन्यांमध्ये १३८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ अर्धशतके झळकावली आहेत.तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, १६ सामन्यांमध्ये त्याने ३५१ धावा केल्या आहेत.

glenn phillips
RR vs SRH Match Result: अंतिम चेंडूवर ४ धावांची गरज अन् समदचा खणखणीत षटकार! हैदराबादचा राजस्थानवर जोरदार विजय

हैदराबादचा राजस्थानवर थरारक विजय

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने ६६ आणि यशस्वी जयस्वालने ३५ धावांचे योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर हैदराबाद संघाने २ गडी बाद २१४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने सर्वाधिक ५५ तर, राहुल त्रिपाठीने ४७ धावांचे योगदान दिले.

शेवटी हॅरी ब्रुकने ताबडतोड फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदने षटकार मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com