Who Is Mohsin Khan: १ वर्षानंतर कमबॅक, वडील ICU मध्ये असतानाही पठ्ठ्यानं मैदान मारलं; मुंबईला नडलेला Mohsin Khan आहे तरी कोण?

Mohsin Khan: लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान या सामन्याचा हिरो ठरला.
mohsin khan
mohsin khan saam tv

LSG VS MI, IPL 2023: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पार पडला. घरच्याच मैदानावर मुंबईला धूळ चारत लखनऊ सुपर जायंट्स संघाने ५ धावांनी विजय मिळवला.

लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान या सामन्याचा हिरो ठरला. त्याने अंतिम षटकात मुंबईच्या टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनला ११ धावाही करू दिल्या नाही. दरम्यान सामन्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

mohsin khan
IPL 2023 Playoffs: LSG विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई स्पर्धेतून बाहेर? तर या २ संघांची लागली लॉटरी; पाहा समीकरण

मोहसिन खानने हा सामना झाल्यानंतर म्हटले की, ' आमचा प्लॅन हाच होता की, जे आम्ही ठरवलं आहे तेच मैदानावर जाऊन करायचं आहे. क्रुणाल देखील माझ्यासोबत चर्चा करत होता, त्याला देखील मी हेच सांगितलं.

मी काहीच बदल केला नव्हता. मी स्वतः ला शांत ठेवायचा प्रयत्न करत होतो. मी स्कोअर बोर्ड पाहतच नव्हतो. मला ६ चांगले चेंडू टाकायचे होते. विकेटवर चेंडू थांबून येत होता, त्यामुळे मी स्लो चेंडूचा वापर केला. मी २ चेंडू टाकले त्यानंतर मी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता.' (Latest sports updates)

mohsin khan
IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

तसेच तो पुढे म्हणाला की, ' माझ्यासाठी कठीण काळ होता. कारण मी १ वर्षानंतर दुखापतीतून पुनरागमन करतोय. माझे वडील कालच ICU मधून बाहेर आले आहेत. ते गेले १० दिवस रुग्णालयात होते. मी त्यांच्यासाठीच हे केलं आहे. ते मला पाहत असतील. मला या सामन्यात खेळण्याची संधी दिल्यामुळे मी गौतम सर, विजय सरांचे आभार मानतो. मला शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती.'

मोहसिन खान यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात होता. मात्र संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू असल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता त्याने मुंबई विरुद्ध खेळतानाच जोरदार कामगिरी केली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद १७७ धावा केल्या होत्या. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला २० षटक अखेर ५ गडी बाद १७२ धावा करता आल्या. मुंबईला या सामन्यात ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com