Ruturaj Gaikwad GF: त्याला पाहण्यासाठी तिने गाठलं थेट चेन्नई! ऋतुराजने शेअर केलेल्या PHOTO मधील 'ती' मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?

Ruturaj Gaikwad Girlfriend: तो आता मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे
ruturaj gaikwad
ruturaj gaikwad google

Ruturaj Gaikwad Instagram: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नईला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. आता अंतिम सामन्यात विजय मिळवून चेन्नईचा संघ पाचव्यांदा जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा विजय मिळवून देण्यात ऋतुराज गायकवाड मोलाची भूमिका बजावू शकतो.

दरम्यान तो आता मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे.

ruturaj gaikwad
GT vs MI Eliminator: राशिद ते मधवाल, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा,गाजवू शकतात क्वालिफायरचा सामना

मैदानावर तुफानी हाणामारी करून गोलंदाजांचा समाचार घेणारा ऋतुराज गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या दैनंदिन आयुष्यातील फोटो शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत विषय ठरतेय.

काही दिवसांपूर्वीच ऋतुराज गायकवाड आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने ७७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता.

या खेळीनंतर त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने खास कॅप्शन देत एका मुलीचा फोटो देखील शेअर केला आहे. (Latest sports Updates)

ruturaj gaikwad
ruturaj gaikwadinstagram
ruturaj gaikwad
ruturaj gaikwad instagram

ऋतुराज गायकवाडने हा फोटो शेअर करत कॅप्शन देत लिहिले की,'चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी ५० वा सामना. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. आम्ही हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचलो आहोत.

त्यामुळे हा सामना खास होता. चेपॉकमध्ये भेटू. या कॅप्शनच्या शेवटी त्याने लिहिले की 'सरप्राईज भेटीसाठी थँक्यू @utkarshaaa13'.

त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये डेवोन कॉनव्हेची पत्नी किमसह आणखी एक मुलगी असल्याचं दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातलेली ही मुलगी उत्कर्षा असल्याचे दिसल्याचे दिसून येत आहे. त्याने तिला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

ऋतुराज गायकवाडने ही पोस्ट शेअर केल्यानंतर उत्कर्षा आहे तर कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या पोस्टवर @utkarshaaa13 ने कमेंट देखील केली आहे. तिने ऋतुराज गायकवाडच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, 'तिथे असताना आणि तुला खेळताना पाहण्यात नेहमीच आनंद होतो.' या कमेंटवर ऋतुराज गायकवाडने देखील रिप्लाय केला आहे. त्याने हार्टचा इमोजी शेअर केला आहे.

इतकेच नव्हे तर २० मे रोजी झालेल्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने @utkarshaaa13 अकाऊंटची एक स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामळे ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांच्यात नक्कीच काहीतरी सुरु आहे, अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज गायकवाड हे दोघे आधीपासूनच एकमेकांना फॉलो करतात. यापूर्वी देखील तिने ऋतुराज गायकवाडच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com