
आशिया चषकात रविवारी भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. गेल्या सामन्यात जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.
शाहीन आफ्रिदीच्या भन्नाट गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. आता शाहीन आफ्रिदीचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला आहे.
हा सराव करण्यात थ्रो डाऊन स्पेशलिस्ट नुआन सेनाविरत्नेने भारतीय फलंदाजांना मदत केली आहे. मात्र हा खेळाडू नक्की आहे तरी कोण?
श्रीलंकेसाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारा सेनाविरत्ने भारतीय संघातील फलंदाजांना मदत करतोय. सेनाविरत्नेचने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ११२ धावा केल्या. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
मात्र त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे क्रिकेटला पाठ दाखवून ड्रायव्हरची नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. बरेच वर्ष त्याने स्कुल व्हॅनदेखील चालवली.
Thepapare.com च्या वृ्त्तानूसार, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्याने त्याने स्कुल व्हॅन चालवण्याचा निर्णय घेतला होता. ही स्कुल व्हॅन तो जिथे पार्क करायचा तिथे श्रीलंकेचा अ संघ सराव करायचा.
हळू हळू त्याने श्रींलका अ संघाचे यष्टीरक्षण प्रशिक्षक मनोज अबेविक्रमा यांना मदत करायला सुरूवात केली. त्यांना प्रशिक्षण द्यायला चांगलं जमायचं ही बातमी श्रीलंका क्रिकेट मंडळापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी सेनाविरत्नेला यष्टीरक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली होती. (Latest sports updates)
असा बनला थ्रो डाऊन स्पेशलिस्ट..
राष्ट्रीय संघाचे सहाय्यक यष्टीरक्षक प्रशिक्षकपद मिळाल्यानंतर सेनाविरत्ने २०१६ ला पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ग्राहम फोर्ड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. ग्राहम यांनी पाहिलं की, इंग्लंडचा संघ फलंदाजांचा सराव करून घेण्यासाठी साईड आर्मचा वापर करत आहे.
हे पाहिल्यानंतर ग्राहम यांनी ही जबाबदारी सेनाविरत्नेकडे सोपवली होती. तो ताशी १५० किमीच्या गतीने चेंडू फेकायचा. इथून सेनाविरत्नेवर थ्रो डाऊन स्पेशलिस्टचा टॅग लागला.
भारतीय संघ जेव्हा २०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार होता. विराटने सेनाविरत्नेला पाहिलं आणि त्याला बीसीसीआयच्या सपोर्ट स्टाफमध्ये घेण्याची विनंती केली.
त्यावेळी बीसीसीआयने त्याला १० पटीने अधिक मानधन देणार असल्याची ऑफर दिली होती. या ऑफरचा स्विकार केल्यापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघासोबत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.