
क्रिकेट हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगातील १०० हुन अधिक देश हा खेळ खेळतात. वेळेनूसार क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. टी-२० क्रिकेट आल्याने या खेळात ग्लॅमरची देखील एन्ट्री झाली आहे.
मात्र काही अशा समस्या आहेत ज्यावर अजूनही तोडगा काढता आलेला नाही. त्यापैकीच एक प्रमुख समस्या म्हणजे पाऊस.
क्रिकेटमध्ये कितीही क्रांती घडली असली, तरीदेखील पावसामुळे अनेक महत्वाचे सामने रद्द करावे लागले आहेत. क्रिकेटमध्ये इतका पैसा असूनही पावसात सामना खेळता येईल असं स्टेडियम का बनवलं गेलं नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. दरम्यान जाणून घ्या काय आहेत यामागची प्रमुख कारणं.
क्रिकेटमध्ये हवामानही तितकंच महत्वाचं आहे. कारण खेळपट्टीवर चेंडू किती फिरेल, किती स्विंग होईल हे हवामानानूसार ठरत असतं. दक्षिण आफ्रिका,इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चेंडूला स्विंग जास्त मिळतो.
कारण चेंडू स्विंग होण्यासाठी तिथे पोषक वातावरण असतं. तर भारतात चेंडू जास्त फिरतो. जर क्रिकेटचे सामने बंद स्टेडियममध्ये खेळवले गेले तर चेंडूला स्विंग मिळणार नाही.
क्रिकेटचे सामने बंद स्टेडियममध्ये न खेळवण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे बजेट. क्रिकेटचं स्टेडियम बनवण्यासाठी कोट्यावधींचा खर्च येतो. जर बंद स्टेडियम बनवायचं असेल तर हा खर्च दुप्पट होऊ शकतो. जे क्रिकेट मंडळांना परवडणार नाही. (Latest sports updates)
स्टेडियमला बंद करण्यासाठी ज्या छताचा वापर केला जाईल. ती छत देखील खेळाडूंसाठी अडथळा निर्माण करू शकते. कारण फलंदाज जेव्हा फटकेबाजी करतात तेव्हा चेंडू हवेत किती उंच जाईल याचा नेम नसतो.
तो चेंडू वर छताला लागू शकतो. तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चेंडू हवेत गेल्यास जेव्हा क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी जाईल तेव्हा वर छत असल्याने त्याला झेल टिपताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या कारणांमुळेच क्रिकेट हा खेळ मोकळ्या मैदानात खेळला जातो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.